एक्स्प्लोर

Gondia News : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलेली वाघीण तीन दिवसांतच बेपत्ता; ताडोबातून झाले होते आगमन

वाघाचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी ताडोबा इथून आणलेल्या वाघिणीचं नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यात आलं होतं. मात्र, अवघ्या तीन दिवसातच ती वाघीण गायब झाल्याची बातमी समोर आलीय.

गोंदिया : वाघाचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी ताडोबा (Tadoba) इथून आणलेल्या वाघिणीचं नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (Navegaon Nagzira Tiger Reserve) स्थानांतरण करण्यात आलं होतं. मात्र, अवघ्या तीन दिवसातच ती वाघीण (Tiger) गायब झाली असल्याची बातमी समोर आली आहे. या वाघिणीवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी तिला सॅटेलाईट जीपीएस कॉलरही लावण्यात आलं होत. त्यावरुन गेल्या दोन दिवस तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं होत. मात्र, त्यानंतर तिला लावण्यात आलेलं कॉलर जंगलात एकाच जागेवर दिसून येत असल्यानं नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, सॅटेलाईट जीपीएस कॉलर नागझिरा अभयरण्यातील कक्ष क्रमांक 95 मध्ये जमिनीवर पडलेले आढळले आहे. त्यामुळं हा कॉलर आयडी वाघीणीनं काढला असावा का, किंवा तिची शिकार तर झाली नाही ना, असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित होता आहे. परिणामी, यादृष्टीनं नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी या वाघिणीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

अवघ्या तीन दिवसात वाघीण बेपत्ता

नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी मागील वर्षी 20 मे ला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ताडोबातील नर आणि मादा अशा दोघांना नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलं होत. त्यानंतर नुकतेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका दोन वर्षीय वाघिणीला नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडून तिचं पुनर्वसन केलं. ही मादा एन टि-3 वाघीण असून  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आलं होत. त्यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चमूच्या सहाय्याने ट्राक्युलाइज करून या वाघिणीला जेरबंद करण्यात आलं होतं.

सॅटेलाईट जीपीएस कॉलर आढळून आल्याने खळबळ 

वाघिणीला सोडल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर आणि व्हिएचएफ (Satellite GPS collar and VHF) च्या सहाय्यानं वाघिणींचं सनियंत्रण केलं जाणार असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती. तसेच या वाघीणीवर संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रीत केले जाणार असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले होतं. या एक स्थलांतरीत वाघिणींच्या निरीक्षणानंतर आणि उर्वरित घटक लक्षात घेऊन इतर मादा वाघांना टप्प्या-टप्प्यानं स्थानांतरीत केलं जाणार असल्याचे सांगण्यात आले असतानाच ही एन टि-3 वाघीण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी वनविभागाची सर्व संबंधित यंत्रणा कामाला लागली असून या वाघिणीचा शोध सध्या घेण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget