Gondia News : अनियंत्रित कार थेट खोल पाण्यात कोसळली; एकाने अशी काही शक्कल लढवली की तिघं थोडक्यात बचावले
Gondia News: गोंदियाच्या हलबीटोला शेत-शिवारात आज एक अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल पाणी असलेल्या खड्ड्यात एक भरधाव अनियंत्रित कार कोसळलीय.
Gondia News गोंदिया : गोंदियाच्या हलबीटोला शेत-शिवारात आज एक अपघाताची (Accident) धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल पाणी असलेल्या खड्ड्यात एक भरधाव अनियंत्रित कार कोसळलीय. सुदैवाने यामध्ये तिघेही सुखरूप बाहेर निघाले आहेत. या चारचाकी वाहनात वाहन चालकासह तिघे बसून होते. कार खड्ड्यात पडताच कारमधे पाणी भरू लागले. वाहन गळाला लागत असल्याने वाहनातून बाहेर निघण्याचे सर्वच रस्ते जवळपास बंद झाले होते. पण वाहनातील एकाने हिंमत हारली नाही आणि अशी काही शक्कल लढवली की तिघं सुखरूप बाहेर पडलेत. परिणामी प्रसंगावधान राखल्याने ते तिघे थोडक्यात बचावले आहेत.
नशीब बलवत्तर म्हणून तिघे थोडक्यात बचावले
आज पाहटेपासून विदर्भात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना आज सकाळपासून कोसळणाऱ्य मुसळधार पावसाने (Rain) धो- धो धुतलंय. दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केले आहे. दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक मार्ग जलमय झाले आहे. परिणामी अपघातांची शक्यताही वाढली आहे. अशीच एक अपघाताची घटना आज गोंदियाच्या हलबीटोला शेत-शिवारात घडलीय. एक अनियंत्रित भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल पाणी असलेल्या खड्ड्यात पडली.
या कारमध्ये तीन युवक होते. ही कार ज्यावेळी तळाशी लागत असल्याचे समजलं आणि बाहेर निघण्याचे मार्ग जवळ जवळ बंद झाल्याने, त्यातील एकाने मोठी हिम्मत दाखवली. त्याची ही हिम्मत आणि मृत्यूवर मात करण्याची धडपड एखाद्या फिल्मी दुनियात घडणाऱ्या घटनेसारखीच होती. वाहनातील एकाने पाण्याच्या आतमध्ये वाहनाच्या दाराचे काच फोडून दोघांना सुखरूप बाहेर काढले.परिणामी प्रसंगावधान राखल्याने ते तिघे थोडक्यात बचावले आहेत.
दरड कोसळल्यानं नागपूर - रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोडंबली
मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळं सर्वत्र जिल्ह्यात जलमय परिस्थिती निर्माण झालेली असतानाच नागपूर - रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथील पहाडीची दरड कोसळली आहे. या दरड कोसळल्यानं राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मागील दोन तासांपासून खोळंबली होती. नॅशनल हायवे प्राधिकरणानं कोसळलेली दरड बाजूला केल्यानंतर आता वाहतूक संथगतीनं सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
गोंदियातील पुजारीटोला धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडले
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला हा धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा धरण असुन तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे १३ पैकी १३ ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून १२, ९६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या