एक्स्प्लोर

सावळे सुंदर रुप मनोहर! विठ्ठल रुक्मिणी सजले हिरेजडीत दगिण्यात, दिवाळीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

आज नरकचतुर्दशी निमित्त परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला (Vitthal Rukmini) ठेवणीतील हिरेजडित अलंकार परिधान करण्यात आले आहेत.

Diwali Pandharpur Vitthal Rukmini Mandir : आज नरकचतुर्दशी निमित्त परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला (Vitthal Rukmini) ठेवणीतील हिरेजडित अलंकार परिधान करण्यात आले आहेत. दीपावलीनिमित्त विठ्ठल मंदिराला (Vitthal Rukmini Mandir) आकर्षक विद्युत रोषणाई ( attractive electric lighting) देखील करण्यात आली आहे. विठ्ठल भक्तांनी मंदिरात रांगोळ्याच्या पायघड्याही घातल्या आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीला दागिने परिधान केल्यानं देवाचं रुप 'सावळे सुंदर रुप मनोहर' या उक्तीप्रमाणे अधिकच सुंदर दिसत आहे. 

देवाला कोणते दागिणे केले परिधान?

विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया, हिऱ्याचे कंगन जोड,  मोत्याचा तुरा, मारवाडी पेठांचा मोत्यांचा हार, मोत्याची कंठी, शिरपेच, मोहरांची माळ, तुळशीची माळ, तोडे जोड,  मत्स्य जोड, पदकासह लॉकेट असे हिरेजडित दागिने परिधान केले आहेत. तर श्री रुक्मिणी मातेस सुवर्ण मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. 

विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई 

आज नरकचतुर्दशी  निमित्ताने श्री. विठ्ठल सभा मंडप येथे श्री.नंदू शिंदे, मुंबई  यांनी श्री. विठ्ठलाची आकर्षक  रांगोळी साकारली आहे. विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिर विविध रंगाने उजळून निघाले आहे. दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदीरावर आकर्षक रोषणाई केली जाते. तसेच देवाला दागिणे परिधान केले जातात.

राम मंदिराच्या दर्शन व्यवस्थेप्रमाणे विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन व्यवस्था सुरु होणार

कार्तिकी एकादशी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या निमित्ताने 4 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेत आयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शन व्यवस्थेप्रमाणे विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार आहे. यामुळे विठुरायाची लांबच लांब दर्शन रांग आता इतिहास जमा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्यवस्थेसाठी मंदिराला निधी देत चार मजली दर्शन मंडप बांधण्याच्या कामास हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता देशभरातील लाखो भाविकांना विठुरायाचे सुलभ व झटपट दर्शन होणे शक्य होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Vitthal Mandir Darshan : कार्तिकी यात्रेत टीसीएस कंपनी विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरु करणार, भाविकांचा वेळ वाचणार; मंदिर समितीचा मोठा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget