Majha Katta: बालदिनानिमित्त वैभव मांगलेंची 'माझा कट्टा'वर हजेरी, पालकांना दिला महत्वाचा सल्ला
बालदिनानिमत्त वैभव मांगले यांनी माझा कट्ट्यावर बोलताना पालक वर्गासाठी महत्वाचा संदेश दिलाय. पालकांचे मुलांकडं दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी म्हलटंय.
Majha Katta: अभिनय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. त्यापैकी काहीजण यशाच्या शिखरावर पोहचतात. तर काहीच्या वाटेला अपयश येतं. आज आपण अशाच एका मराठी अभिनेते वैभव मांगले यांच्याविषयी बोलणार आहोत. बालदिनानिमित्त वैमव मांगले यांनी माझ्या कट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी वैभव मांगलेंनी त्यांच्या जीवनातील अनेक चढ-उतार सांगितले आहेत. वैमव मांगले हे मूळचे कोकणाचे आहे. त्यांचे रंगभूमी सोबत रंगाचे स्वर कसे जुळले? कोकणाच्या मातीचं आणि त्यांचे नात कसं? त्यांना गळ्यातील सूर त्यांना नेमका कसा गवसला? तसेच बालदिनानिमित्त त्यांनी पालकवर्गांनाही महत्वाचा सल्ला दिलाय. या सगळ्याबद्दल जाणून घेताना त्यांचा आज वरचा प्रवास जाणून घेऊयात.
वैभव मांगले यांना आपण अनेक चित्रपटात, नाटकात नेहमीच अनोख्या भूमिकेत पाहिलंय. अलबत्या गलबत्या नाटकांमध्ये वैभव मांगले यांनी चिंची नावाच्या चेटकिनीची भूमिका साकारलीय. अलबत्या गलबत्या हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बालनाट्य आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली यातली चेटकीण आजही जुन्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आज ही भूमिका मराठी रंगभूमीवरील एक चतुरस्र अभिनेते वैभव मांगले यात साकारत आहेत. त्यांच्या भूमिकेनं बालदोस्तांच्या भाव विश्वाच धुमाकूळ घातला. चिंची ही चेटकीन असतानाही लहान मुलांसाठी आकर्षित ठरलीय. तसेच नाटकापासून दूर जाताना नाटकापासून दूर जात असलेल्या नव्या पिढीला पुन्हा एकदा नाटकगृहांकडे ओढून आणलंय. बालदिनानिमित्त वैभव मांगले यांनी माझा कट्ट्यावर अलबत्या गलबत्या या नाटकासंबंधित अनेक गंमतीदार किस्से सांगितले आहेत.
अलबत्या गलबत्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा अनुभव कसा होता?
अलबत्या गलबत्या नाटकाच्या पहिला प्रयोगाबाबत वैभव मांगले म्हणाले की, गेल्या अनेक दिवसानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या नाटकाचा पहिला प्रयोग वाशीत करण्यात आला. दोन वर्षानंतर पुन्हा ती भूमिका करणे आव्हानात्मक होतं. पहिल्या प्रयोगाच्या आधी अलबत्या गलबत्या नाटकाची संपूर्ण धास्तावून गेलीय. हा प्रयोग यशस्वी होतोय की नाही? हे नाटक पाहण्यासाठी मुलं येतायेत का नाही? यांचीच सर्वांना चिंता सतावत होती. परंतु, पहिल्या प्रयोगाच्या दिवशीच माझ्या ऐन्ट्रीला एक मुलगी जोरात किंचाळली आणि आई मला बाहेर घेऊन चल अशी म्हणाली. त्यावेळी अनेक मुलांना घाबरल्याचं आणि रडताना पाहून आपण पहिल्या सारखंच काम करतोय, असे मला वाटले.
प्रयोगानंतरही वैभव मांगले मेकअप का काढत नाहीत?
अलबत्या घलबल्या हे नाटकाचा प्रयोग पूर्ण झल्यानंतरही वैभव मांगले त्यांचा मेकअप काढत नाहीत. कारण, हा प्रयोग संपल्यानंतर अनेक लहान मुलांना चेटकीनसोबत फोटो काढायचा असतो. या विषयावर बोलताना वैभव मांगले म्हणाले की, अलबत्या गलबत्या नाटकांचा पुण्यात प्रयोग झाला. त्यावेळी नाटक पाहायला आलेल्या एका मुलीला या नाटकात पाहिलेली चेटकीन पाहायची होती. परंतु, मी मेकअप काढला होता. परंतु, काहीही करून चेटकीनला भेटायचं होतं. त्यासाठी तिनं अक्षरशा: जमीनीवर लोळण घेतलं. रडू लागली. ज्यामुळे मला पुन्हा मेकअप करून तिच्यासमोर यावं लागलं.
वैभव मांगले यांचा रत्नागिरी ते मुंबईचा प्रवास-
वैभव मांगले हे मूळचे रत्नागिरीचे आहेत. त्यांचा रत्नागिरी ते मुंबई हा प्रवा कसा ठरला? यावरही त्यांनी बोललं आहे. "जेव्हा एखाद्या ठिकाणी आपलं मन रमत नसेल किंवा गुदमरल्या सारखं वाटतं असेल, तेव्हा आपण ते ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतो. त्या काळात माझ्यासोबतही अशाप्रकारच्या अनेक गोष्टी घडल्या. तेव्हा माझ्या आयुष्यात काहीही घडत होतं. बीएससी डीए़ड होऊनही नोकरी नाही. त्यावेळी वडील म्हणायचे कमवता हो, हातभार लाव, याचं प्रेशर खूप होतं. त्यानंतर मी रत्नागिरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपला छंद, आवडीच्या विषयात काही करता येतंय का? हे पाहण्यासाठी मी मुंबई गाठली", असंही वैभव मांगले यांनी म्हटलंय.
मराठी की गणित? वैभव मांगले यांचा आवडीचा विषय कोणता?
वैभव मांगले यांना मराठी विषय आवडत होता. दहावीनंतर त्यांना मराठी विषय घेऊन एमए करायचे होतं. परंतु, त्यांच्या वडिलांना त्यांना नकार देत बीएससीला प्रवेश घेण्यास सांगितला. "अकरावीच्या शिक्षकांनी मला सांगितलं की, तुला गणिताचं काहीही येत नाही. तू गणित घेऊ नको. तू भूगोल घे त्यात तुला चांगले गुण मिळतील", असाही एक गंमतीदार किस्सा त्यांनी सांगितला.
बालदिनानिमत्त वैभव मांगले यांनी माझा कट्ट्यावर बोलताना पालक वर्गासाठी महत्वाचा संदेश दिलाय. पालकांचे मुलांकडं दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी म्हलटंय. "पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देत नसल्यानं त्यांच्यावर चांगलं संस्कार घडत नाहीत. पालकांनी त्यांच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. पालकांनी मुलांकडे शब्दांची देवाण- घेवाण करणं गरजेचं असतं. मुलांनी दिवसभर काय केलं? याची पालकांनी विचारपूस केली पाहिजे. तसेच आपण ऑफिसमध्ये, कामावर काय केलं? हे देखील मुलांना सांगितलं पाहिजे".