एक्स्प्लोर
राष्ट्रभक्तीसाठी जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला : साध्वी प्रज्ञा
‘देशासाठी आणि राष्ट्रभक्तीसाठी जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला.’ असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंग यांनी दिला आहे.
औरंगाबाद : ‘देशासाठी आणि राष्ट्रभक्तीसाठी जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला.’ असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंग यांनी दिला आहे. औरंगाबादमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं साध्वी प्रज्ञासिंग यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या.
याचवेळी त्यांनी राम मंदिराचाही विषय उपस्थित केला. ‘राम मंदिरासाठीच आपला जन्म झाला आहे.’ असं त्या यावेळी म्हणाल्या. ‘आधीचं सरकार राम मंदिराला विसरलं आणि केवळ निवडणुकासाठी मंदिरात गेले.’ असं म्हणतं त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका केली.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोपही केले. 'तुरुंगात असताना आपली आणि आपल्या वकिलांना मारण्याची सुपारी पाकिस्तानातून देण्यात आली होती.' असा दावाही त्यांनी यावेळी केला.
‘भगव्याला बदनाम करण्यासाठी मला जेल मध्ये टाकलं, हे मोठं षड्यंत्र होतं. एका स्त्रीला, एका संन्यासीला त्रास दिला. भारताच्या भगव्याला दहशतवादी घोषित करणे हे षड्यंत्र होतं, मात्र भगवा प्रखर आहे.’ असंही त्या यावेळी म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement