एक्स्प्लोर

सांगलीत हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश, मुस्लीम कुटुंबाच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या मिरजेतील एकता मंडळाला गणपतीची प्रतिष्ठापना कुठे करायची असा प्रश्न सतावत होता. मात्र, मंडळाचे कार्यकर्ते रमजान मुलाणी यांनी स्वत:च्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून पेच सोडवला आणि जिल्ह्यातील नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सांगली : मिरजेच्या ढवळी येथे जाती-पातीचे बंधन तोडून एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. कोरोनामुळे यंदा गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप टाकून गणपती न बसवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. या पार्श्वभूमीवर ढवळी गावातील गणेशनगर येथील एकता मंडळाला गणपती कुठे बसवायचा हा प्रश्न पडला होता. मात्र, मंडळाचे कार्यकर्ते रमजान मुलाणी यांनी स्वत:च्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून पेच सोडवला आणि जिल्ह्यातील नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

कोरोनामुळे यंदा सार्वजनिक मंडळाळांचे गणपती स्थपना करू नका, असे प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे गणपती कुठे बसवायचा, हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार होते. तसेच, प्रथेनुसार एका घरात दोन गणपतींची प्रतिष्ठापना होत नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बसवणे शक्य नव्हते. त्यामुळे, मी माझ्या घरी गणपती बसवणार, असे मंडळाला कळवले व त्यानुसार घराता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. आता मी, माझी पत्नी व कुटुंब दररोज गणपती बाप्पाची आराधना करतो, असं रमजान मुलाणी यांनी सांगितले.

गणपती बाप्पाला कुठे बसवायचे हा प्रश्न होता. त्यासाठी अनेक बैठका झाल्या. आम्हाला चिंता सतावत होती. अशात मुलाणी यांनी पुढाकार घेत आपल्या घरी बाप्पाला बसवण्याचा निर्णय घेतला. याचा आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही त्यांच्या प्रस्तावाला त्वरित होकार देत त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली, असे एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी सांगितले. तसेच, आमच्या गणेश मंडळाचे नाव एकता आहे. त्यामुळे, आम्ही सर्व एकत्र गुण्यागोविंदाने राहतो. केवळ, नावातच एकता नसून प्रत्यक्षात आमच्यात एकता असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

काही समाजकंटकांमुळे नेहमीच दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करणारे प्रसंग घडतात. मात्र, अशा समाजकंटकांना रमजान मुलाणी आणि एकता गणेश उत्सव मंडळाने चपराक दिली आहे. शिवाय, त्यांची कृती समाजासमोर एक आदर्श असून समाजात अशाच पद्धतीने एकता राहिली पाहिजे हा संदेश त्यातून दिला जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola:संगमनेमध्ये कुणाची हवा? जनता कुणाला कौल देणार? मुद्दाचं बोला थेट संगमनेरहून #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 5PM 13 November 2024Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Embed widget