Ganesh Chaturthi 2021: बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पहाटे पावणे पाचपासून ते दुपारी पावणे दोनपर्यंत करा, पंचागकर्ते पंडित मोहन दाते यांची माहिती
Ganesh Chaturthi : ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करू शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
सोलापूर : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या ( Ganeshotsav 2022) आगमनाकरता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. उद्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी प्रत्येकजण करत आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत प्रसिद्ध दाते पंचागचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली आहे.
मोहन दाते म्हणाले, मागच्या वर्षी 10 सप्टेंबरला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. ती यंदा 31 ऑगस्टला होणार आहे. ही स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करू शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. घरातली सकाळची पूजा झाली की, त्यानंतर गणरायची उत्साहात स्थापना करावी. ज्यांच्याकडे जितक्या दिवसचा गणपती आहे त्यांनी त्याप्रमाणे सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती करावी.
गौरी आवाहन कधी करावे?
3 सप्टेंबरला ज्यांच्याकडे गौरी आहे. अनुराधा नक्षत्रवर दिवसभरात केव्हाही गौरी आणून आवाहन करता येईल. 4 सप्टेंबरला रविवारी गौरीपूजन ज्याला आपण गौरी जेवतात असं म्हणतो तो रविवारचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची सकाळी दुपारी पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. 5 सप्टेंबरला तारखेला मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन असल्याने रात्री 8 वाजेपर्यंत कधीही आपल्या सोयीने गौरी विसर्जन करता येणार आहे. 9 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी ज्यांच्याकडे दहा दिवसाचा गणपती आहे त्यांनी विसर्जित करा. सार्वजनिक गणेश मंडळाना देखील लवकर गणपती स्थापना करण्याचे आवाहन दाते गुरूजींनी केले आहे.
गणपती पूजेची यादी
हळद, कुंकू, शेंदूर, अबीर, गुलाल, अक्षता, गंध, फुले, हार, दूर्वा, बेल, पत्री, नारळ दोन, फळे पाच, विड्याची पाने 10, सुपा-या पाच, सुटे पैसे, गूळ खोबरे, पंचामृत, उदबत्ती, निरांजन, कापूर, अत्तर, काडेपेटी, कापसाचे वस्त्र, जानवीजोड, पळी भांडे 1, ताम्हन 1, तांब्या 1, नैवेद्याला पेढे/मोदक.
संंबंधित बातम्या :
Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला 'या' राशींचे भाग्य बदलणार, पूजा करताना करा या गोष्टी