Ganesh Chaturthi 2025 Live Blog Updates : गणपती बाप्पा मोरया! मुंबई-पुण्यात गणपती बाप्पांचं आगमन; लालबागचा राजा विराजमान
Ganesh Chaturthi 2025 Live Blog Updates : घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणराया विराजमान झाले आहेत. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
LIVE

Background
Ganesh Chaturthi 2025 Live Blog Updates : आजपासून राज्यासह देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे अगदी आनंदात आणि जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणराया विराजमान झाले आहेत. त्यानुसार, गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा सध्या सगळीकडे सुरु आहे. या निमित्ताने राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
Ganesh Chaturthi Updates : वर्ध्यात गणेश उत्सवाची धामधूम, मातीच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यावर भर
Ganesh Chaturthi Updates : वर्ध्यात गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. गणेश भक्तांसाठी आवश्यक असणाऱ्या गणेश मूर्ती वर्ध्याच्या मगण संग्रहालय परिसरात उपलब्ध झाल्या असून यावर्षी गणेश मूर्तीच्या किंमती देखील वाढल्या आहेत. मातीच्याच मूर्तीची स्थापना करा असा आग्रह कुंभार बांधवांकडून होत असताना मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर देखील तसे फलक लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुमारे 13 हजार 22 घरगुती तर 262 ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे. तर 89 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना केली जाणार आहे. मातीच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. विविध सामाजिक संदेश आणि सामाजिक देखावे सार्वजनिक गणेश मंडळाकडून साकारले जात आहेत.
Ganesh Chaturthi 2025 : दगडूशेठ गणपती उत्सव मंडपाच्या दिशेने बाप्पा मार्गस्थ; अवघा परिसर दुमदुमला
Ganesh Chaturthi 2025 : दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली असून गणपती उत्सव मंडपाच्या दिशेने बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. मोरया मोरयाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमला आहे. आकर्षक फुलांच्या रथातून दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणूक निघाली. मंडळाकडून यंदा केरळच्या पद्नाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मुख्य मंदिरातून उत्सव मंडपात मूर्ती विराजमान होणार आहे. मूर्ती उत्सव मंडपात विराजमान झाल्यावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
























