एक्स्प्लोर

Gadchiroli Naxal : रस्ता बांधकामाला विरोध दर्शवत नक्षलवाद्यांनी केले ट्रॅक्टर आणि जेसीबी खाक; पत्रकांतून दिली 22 डिसेंबरला भारत बंदची हाक

Gadchiroli News : भामरागड तालुक्यातील हिदूर गावात रस्ता बांधकामासाठी असलेले वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळले आहे. या घटनास्थळी नक्षल्यांनी काही पत्रके सोडत त्यात 22 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

Gadchiroli Naxalism News : गडचिरोलीच्या (Gadchiroli) भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम हिदूर गावात रस्ता बांधकामासाठी असलेले वाहनांची नक्षलवाद्यांनी (Naxal) जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे  कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे. 19 डिसेंबरच्या मध्यरात्री नक्षल्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहने पेटवली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनास्थळी नक्षल्यांनी काही पत्रके सोडत त्यात 22 डिसेंबर रोजी बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमधील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

चारही वाहन जळून खाक

भामरागडपासून दहा किलोमीटरवर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगत हिदूर- दोबूर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री नक्षल्यांनी बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची जाळपोळ करत या विकासकामाल विरोध  केला. यात एक जेसीबी, टँकरचा समावेश आहे. या घटनेमध्ये  चारही वाहन जळून खाक झाली असून कंत्राटदराचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याच्या कामाला नक्षल्यांचा सुरुवाती पासूनच विरोध हाता. हा भाग नक्षलप्रभावित व संवेदनशील असल्याने येथे कायम नक्षल्यांचे कटकारस्थान सुरू असते. अशीच एक कारवाई 19 डिसेंबरच्या मध्यरात्री नक्षल्यांनी केली. याप्रकरणी माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली. 

पत्रातून नक्षल्यांनी दिली भारत बंदची हाक 

पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पाहणी दरम्यान नक्षल्यांनी तेथे काही पत्रक सोडलेले आढळून आले. या पत्रकात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात प्रतिक्रांतिकारी हल्ले वाढल्याने या विरोधात 16 ते 22 डिसेंबर दरम्यान देशव्यापी प्रचार आंदोलन सुरु असल्याचा दावा केला आहे. याचाच एक भाग म्हणून 22 डिसेंबरला नक्षल्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वी करा असे आवाहन या पत्रातून केले आहे.

रस्ता कामाला होता विरोध

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील अतिदुर्गम हिदूर हा भाग अतिशय नक्षल प्रभावित व संवेदनशील आहे. नक्षल्यांनी या भागात विकासकामाल कायम विरोध दर्शविला आहे. त्याच प्रमाणे हिदूर भागात सुरू असलेल्या नव्या रस्त्याच्या कामाला नक्षल्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. हा भाग छत्तीसगड सीमेलगत असल्याने या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर नागरिकांचे अवागमन या मार्गाने वाढेल असते. तसेच अनेक गोपनिय हालचालींवर बंधन आली असती.  या भीतीमुळे हे विकासकाम नक्षल्यांना नको होते. यामुळे नक्षल्यांनी वाहने जाळून या विकासकामाल विरोध दर्शविला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
रायगडच्या माणगांवमध्ये तलावात सापडला अनोळखी मृतदेह,  परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
रायगडच्या माणगांवमध्ये तलावात सापडला अनोळखी मृतदेह,  परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल
भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Embed widget