एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल दरवाढीचं विघ्न हटेना, मोदींनी बैठक बोलावली
या महिन्याच्या सुरुवातीपासून एखादा दिवस वगळता सलग पेट्रोल दरात वाढ होत आहे.
मुंबई: पेट्रोल-डिझेल दरवाढीचं विघ्न अद्याप दूर झालेलं नाही. आजही इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 88.67 तर डिझेल 77.82 रुपये प्रति लिटर इतका आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 90.45 रुपये तर डिझेल 78.34 रुपये लिटर आहे. त्यामुळे पेट्रोल दर वेगाने शंभरीकडे वाटचाल करत आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीपासून एखादा दिवस वगळता सलग पेट्रोल दरात वाढ होत आहे.
दरम्यान महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांमध्ये नांदेडचा दुसरा नंबर लागला आहे. नांदेडमध्ये आजचा पेट्रोलचा दर 90.25 रुपये इतका आहे. तर डिझेल 78.17 रुपये लिटर आहे.
या यादीत अमरावती तिसऱ्या नंबरवर आहे. अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर 89.92 रुपये इतका तर डिझेल 79.10 रुपये लिटर आहे.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई
पेट्रोल- 88.67 रुपये
डिझेल 77.82 रुपये
परभणी
पेट्रोल 90.45 रुपये
डिझेल 78.34 रुपये
नांदेड
पेट्रोल- 90.25 रुपये
डिझेल 78.17 रुपये
अमरावती
पेट्रोल – 89.92
डिझेल – 79.10
सोलापूर
पेट्रोल – 89.72
डिझेल – 78.44
औरंगाबाद
पेट्रोल 89.71 रुपये
डिझेल 78.88 रुपये
नाशिक –
पेट्रोल 89.04 रुपये
डिझेल 76.98रुपये
जळगाव
पेट्रोल 89.63 रुपये
डिझेल 77.55 रुपये
नंदुरबार
पेट्रोल 89.52रुपये
डिझेल 77.46 रुपये
नागपूर –
पेट्रोल 89.15 रुपये
डिझेल 78.74 रुपये
पुणे –
पेट्रोल 88.45 रुपये
डिझेल 76.42 रुपये
धुळे
पेट्रोल 88.59 रुपये
डिझेल 76.56 रुपये
पंतप्रधानांनी बैठक बोलावली
पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत घटणारं रुपयाचं मूल्य यामुळे मोदी सरकार टीकेचे धनी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर बैठक बोलवली आहे. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटलींसह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील.
संबंधित बातम्या
...तर पेट्रोल 55, डिझेल 50 रुपये प्रतिलीटरने मिळेल- गडकरी
चंद्राबाबूंचा आंध्रवासियांना दिलासा, पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त
भारत बंद, तरीही पेट्रोल दरवाढ चालूच!
पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!
पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलंअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement