शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो सांगत कोट्यवधींची फसवणूक, ‘असा’ घातला माजी सैनिकांना गंडा
शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे
पुणे : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment Scam) करुन अधिक परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. फसवणूक झालेल्या 313 जवानांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून फसवणूक झालेल्या माजी सैनिकांची संख्या अधिक असून या घोटाळ्याची व्याप्ती शेंकडो कोटी रुपयांमध्ये असल्याच्या या माजी सैनिकांचा दावा आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्याने या माजी सैनिकांची फसवणूक केलीय तो सुरेश गाडीवड्डार हा देखील माजी सैनिक असुन गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश गाडीवड्डार आणि त्याच्या कंपनीतील साथीदार फरार झालेत. आयुष्यभराची कमाई गमाऊन बसलेल्या या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना यामुळे जगणं अवघड झालंय.
कोट्यवधींची फसवणूक
आरोपींनी गुंतवणूकदारांना दर महिन्याला सात ते आठ टक्के चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. अशाप्रकारे आरोपींनी कोट्यवधी रुपये उकळले मात्र, पीडितांना कोणताही परतावा मिळवून दिला नाही. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच पीडितांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला.
सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक
खरे सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. विशेष म्हणजे या टोळीत एका 55 वर्षीय महिलेचाही सहभाग समोर आला आहे. CCTV मध्ये ही टोळी फसवणूक करून पळून जाताना दिसत आहे.समोर आलेल्या माहितीनुसार ही, टोळी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना कमी किंमतीत सोनं देण्याचे आमीष द्यायची. नागरिकांचा विश्वास पटावा म्हणून किरकोळ दागिनेही द्यायची. समोरच्याची खात्री झाल्यानंतर त्यांना नकली सोने द्यायची. नागरिकांकडून लाखो रुपये उकळून ही टोळी पळून जायची. खारमध्ये अशाच प्रकारे एका कुटुंबाला या टोळीने लाखोंचा गंडा घातला. या प्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी अथक तपास करून तीन जणांना अटक केली आहे.
हे ही वाचा :
एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले, शेअर मार्केट कोसळण्याची 'ही' आहेत पाच कारणं!