एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Voter List Row: 'ठाकरेंना फक्त हिंदू, मराठी मतदारच दुबार दिसतात का?'; Ashish Shelar यांचा थेट सवाल
महाराष्ट्रामध्ये दुबार आणि बोगस मतदारांच्या (Bogus Voters) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar), मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'ठाकरेंना मराठी, हिंदू आणि दलित मतदारच दुबार दिसतायत का?', असा परखड सवाल आशिष शेलार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारला आहे. शेलार यांनी मतदार यादीतील घोळ निदर्शनास आणताना, एकच नाव पण वेगवेगळे पत्ते, फोटो सारखे पण नावात बदल आणि एकाच व्यक्तीची तीन-तीन वेळा नोंदणी झाल्याचे दावे केले. यावर उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेलारांवर प्रसिद्धीसाठी आरोप केल्याचे म्हटले आणि 'बोगस मतदार म्हणजे बोगस मतदार, तो ना हिंदू आहे, ना मुस्लिम', असे ठणकावले. तर, आमदार रोहित पवार यांनी दुबार मतदार असल्याचे मान्य केल्याबद्दल शेलारांचे आभार मानत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषदेचे आव्हान दिले आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















