Jalna: रामनगर साखर कारखान्याचा व्यवहार संशयास्पद, माजी आमदार माणिकराव जाधव यांचा आरोप
Jalna: रामनगर साखर कारखान्याच्या विक्रीचा घोळ आता समोर येत आहे.
Jalna: रामनगर साखर कारखान्याच्या विक्रीचा घोळ आता समोर येत आहे. 400 एकर जागा, कारखान्याची मशनरी 1 हजार कर्मचारी आणि 10 हजारापेक्षा जास्त सभासद असलेल्या कारखाना अवघ्या 42 कोटीत विकण्याचा डाव अर्धवट राहिला आहे. सगळा व्यवहार संशयास्पद असल्याने ह्याची मालकी कोणाची असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यात ही मूळ मालक कोण हा प्रश्न असल्याने समोर कोणीही येत नसल्याचे माहिती माजी आमदार माणिकराव जाधव देत आहेत
कारखान्याचा इतिहास
रामनगर साखर कारखान्याची स्थापना 1985 साली करण्यात आली. प्रत्यक्षात साखर कारखाना 1987 साली सुरू झालाय. अल्पावधीत कारखाना उत्तम चालू लागला होता. मात्र, 2000 साली बाळासाहेब पवार यांच्या राजकारणाला आणि कारखण्यावरील पगडा कमी करण्यासाठी राजकारण सुरू झाले आणि कारखाना चे दृष्ट चक्र सुरू झाले. राज्य बँकेने आर्थिक मदत देताना हात आखडता घेतला ..याचा परिणाम असा झाला की या भागात मुबलक पाणी आणि ऊस असताना ही कारखाना बंद होता. एकच हंगाम नाही तर 2005 साला पर्यंत माजी आमदार माणिकराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य बॅंकनं 2005 मध्ये कारखान्याला जप्तीची कारवाईची नोटीस दिली. याच काळात संचालक मंडळाच्या निवडणूक झाल्या आणि शेतकऱ्याचे संचालक मंडळ निवडून आले. जे तत्कालीन राजकारण्यांच्या विरोधातील होते. त्यावेळी आम्ही कारखाना चालवू, मात्र त्याची विक्री रद्द करा, अशी मागणी संचालक मंडाळानं केली. याचबरोबर कारखाना विक्री किंवा भाडेतत्वावर चालविण्यासाठी ही देऊ नका, असेही सांगण्यात आलं. हा कारखाना 2006 आणि 2007 साली संचालक मंडळानं चालवला. त्यानंतर राज्य बॅंकेकडून कारखान्याला आर्थिक मदत मिळणं बंद झालं. राज्य बॅंकनं 2008 मध्ये कारखान जप्त केला. हा वाद केंद्रात गेला. गेला नाबार्डनं आर्थिक मदत देऊ करत पॅकेजमध्ये ह्या कारखान्याचा समावेश केला. नाबार्डनं 11 कोटीचं थकीत कर्ज परतफेड करण्यासाठी 9 वर्षांची मुदत दिली. मात्र, यात कुठे माशी शिकली माहीत नाही. राज्य बँकेनं नाबार्ड पॅकेजचे फायदे कारखान्यास मिळू दिले नाही. परिणामी, कारखाना बंद पडला.
त्यानंतर या कारखान्याची तात्काळ विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, 10 हजार भाग भांडवलदार शेतकरी आणि एक हजार कर्मचारी वर्ग असे 400 एकरच्या कारखान्याचे साहित्य आहे. या कारखान्याचे मूल्यामापन करण्यात आले. या कारखान्याची केवळ 16 कोटीत मूल्यमापन करण्यात आल्याची माहिती समोर येताच मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावेळी उच्च न्यायालयानं कारखान्यात 70 हजार पोती साखर शिल्लक असल्याचं सांगितलं. त्या विक्रीतून राज्य बॅंकनं वसुली करावी, असेही आदेश न्यायालयानं दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य बॅंकनं कारखान्यातील साखर विकून वसुली केली.
राज्य बॅंकेचे संचालक मंडळ 7 मे 2011 साली बरखास्त झाले आणि प्रशासक मंडळ अधिकारावर आले. तसेच जुने निर्णय रद्द करण्यात आले. त्यांनी कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला हरकत नाही. मात्र, विक्री करता येणार नाही अशी भूमिका घेतली. 2012 साली विक्री प्रक्रियेला सुरुवात झाली आणि पुन्हा कारखान्याचं मूल्यकांन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे मूल्यमापन 47 कोटी इतके झाले. एकाच कंपनीने याचे मूल्यकांन केले आणि 42 कोटी रुपये रिझर्व्ह प्राईज ठरली. यात किमान दोन मूल्यकांकर करणे अपेक्षित होते.
दोन कंपनींनी विक्री प्रक्रियेत सहभाग घेतला होता. एक तापडिया कन्स्ट्रक्शन आणि अजित सिड्स या दोन्ही कंपनीत पद्माकर मुळे याचं भागभांडवल आहेत. विक्री प्रक्रिया एक वर्ष थंड बसत्यात पडून होती. राज्य शासनानं यास मान्यता दिली नाही. 2013 - 2014 सालच्या हंगामासाठी विक्री प्रक्रिया केल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर चालविण्याची निविदा प्रक्रिया राज्य बँकेने प्रसिद्ध केली. तापडिया कन्स्ट्रक्शननं 10 टक्के रक्कम भरली होती. मात्र, कारखाना त्यांच्या ताब्यात नव्हता. यामुळं कारखाना त्यांनी अर्जुन शुगर इंडट्रीजला 44 कोटीला विकला. यापैकी 37 कोटी आम्ही राज्य बँकेला चेकने दिली असे सांगितले जाते. परंतु, या पैशांचा वाटप करण्यात आलाच नाही. त्याची बॅंकेत कुठेच नोंद नाही. पैसे जमाच झाले नाहीत. त्यामुळं या खरेदी व्यवहारला अद्याप अंतिम रूप आले नाही. याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच यात झालेला व्यवहार संशयास्पद आहे. यात सहभागी असलेल्या संस्था आणि स्थानिक नेते मंडळी आता आमचा संबंध नसल्याचे सांगत आहे, अशी माहिती माजी आमदार माणिकराव जाधव यांनी दिलीय.
अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेत माझा या कारखान्याशी संबंध नाही असे सांगितले आहे ..त्यामुळे याचे मूळ मालक हे शेतकरी आहेत त्यांना कारखाना चालविण्यासाठी देण्यात यावा अशी भूमिका माजी आमदार माणिकराव जाधव यांनी मांडली आहे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha