एक्स्प्लोर

एसटी संप : पुढील 25 वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते

शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

मुंबई : पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे. दिवाकर रावते म्हणाले की, "कर्मचाऱ्यांचा संप कामगार न्यायालयाने, औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तरीही सातव्या वेतन आयोगासाठी त्यांनी संप पुकारला आहे. सातवा वेतन आयोग देण्याची शक्ती महामंडळाची आणखी 25 वर्ष तरी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण एसटी कायम तोट्यात असते. त्यापलिकडे जाऊन सरकारने सातवा वेतन आयोग द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि बैठक बोलावली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मी सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही, तुम्हालाही देऊ शकत नाही. शिवाय दिवाळीच्या काळात संप पुकारुन लोकांना वेठीला धरु नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं." कराराची बोलणी ह्यांनीच बंद केली कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात, करार करण्यासाठी प्रशासन सतत मागे लागलंय, परंतु सातवा वेतन आयोगाशिवाय आम्ही बोलणार नाही, असा त्यांचा एकच हट्ट आहे. त्यामुळे करार होऊ शकलेला नाही. कराराची बोलणी ह्यांनीच बंद केली. कामगारांच्या हिताचं जे जे काही आहे, ते त्यांनी न मागताच आम्ही केलं आहे. त्यांचं हित जपणं आमचं काम आहे. त्याच भावनेतून काम करत असूनही सर्वांना वेठीला धरलं आहे. छाजेड यांच्यामागे संघटना धावतेय तरीही कर्मचाऱ्यांची संघटना छाजेड नावाच्या काँग्रेसमधील व्यक्तीमागे धावतेय. त्यांचं ऐकून संघटना काम करते. छाजेड हे काँग्रेसचे आहेत, त्यांना ह्या सरकाला अपशकून करायचं आहे. त्यांच्या नादाला लागून ही मंडळी संप करतेय, अशी माझी भावना बनली आहे. एकीकडे राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि इतर वर्गाचं लांगूलचालन सुरु असताना अहोरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत मंत्र्यांनी असंवेदनशील विधान का करावं असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाटाघाटीसाठी आमचे दरवाजे उघडे : जयप्रकाश छाजेड दिवाकर रावतेंचं विधान उद्विग्नतेतून आणि विनोदातून आलं आहे, अशी प्रतिक्रिया इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे. "लोकांचे आज जे हाल होत आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी दिवाकर रावते आणि राज्य सरकारची आहे. आम्ही हौसेने संप केलेला नाही, वाटाघाटीसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत," असंही छाजेड म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :
  • एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
  • पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
  • जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी

LIVE: एसटीचा संप, दिवाळीला गावी जाणारे प्रवासी अडकले

पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घेतलेला निलेश विकृत, स्वतःच्याच पत्नीचा तयार केला MMSVaishnavi Hagawane Zero Hour : फडणवीस गृहमंत्रिपदावर राहण्याच्या पात्रतेचे तरी आहेत का? - सरोदेVaishnavi Hagawane Zero Hour : जनतेचा पोलिसांवर विश्वास उरला नाही?  माजी पोलीस अधिकाऱ्याचं परखड मतVaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घ्यायला गेलेल्या कस्पटे कुटुंबाला पोलिसांनी काय सांगितलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली
दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या
दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या
वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा
वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा
Embed widget