एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी (Mumbai univercity) संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे आता विद्यार्थ्यांना २६ मे पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च,  ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबई (Mumbai) विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission  या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.

बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असून आतापर्यंत २,२५,५५६ एवढी नोंदणी झाली असून, १,४५,०८७ एवढ्या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ५,०९,५७८ एवढे अर्ज सादर केले आहेत.

पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रीयेत या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन),  बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरोनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक :

·        अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) – ८ मे ते २६ मे, २०२५ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)

·        प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – ८ मे ते २६ मे, २०२५ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)

·        ऑनलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – ८ मे ते २६ मे, २०२५ (१.०० वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

·        पहिली मेरीट लिस्ट – २७ मे, २०२५ (संध्याकाळी ५.०० वाजता)

·        ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – २८ मे ते ३० मे, २०२५ (दुपारी.३.०० वाजेपर्यंत)

·        द्वितीय मेरीट लिस्ट – ३१ मे, २०२५ (संध्याकाळी ७.०० वाजता)

·        ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २ जून ते ४ जून, २०२५ (दुपारी.३.०० वाजे पर्यंत)

·        तृतीय मेरीट लिस्ट - ५ जून, २०२५ (संध्याकाळी ७.०० वाजता)

·        ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे –६ जून ते १० जून, २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)

·        कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन- १३ जून २०२५

पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा

बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maratha Quota: ‘सातारा गझेटियर’ लवकरच लागू होणार, हैदराबादपेक्षा नोंदणी सुलभ
Farmers' Protest : 'सरकारनं आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालवू नयेत', Bachchu Kadu यांचा इशारा
Sharad Pawar:पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे फडणवीसच सांगू शकतील, नातवावरील आरोपांवर पवारांचे भाष्य
Sharad Pawar : पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे गृहमंत्री फडणवीसच सांगू शकतील - पवार
Sharad Pawar : प्रशासकीय गोष्टी वेगळ्या, कौटुंबिक गोष्टी वेगळ्या - पवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Sharad Pawar & Parth Pawar: पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Embed widget