एक्स्प्लोर

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ, ग्रॅज्युटीचे 1500 कोटी रुपये पुन्हा थकले; कामगार संघटनांचे सरकारला साकडं

Maharashtra News : एसटी कर्मचाऱ्यांना संप काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणि एसटीच्या खर्चाला लागणारी रक्कम चार वर्ष देण्याचं न्यायालयानं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं सरकारच्या वतीनं न्यायालयात मान्य केलं होतं. पण ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही, असं महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. 

Maharashtra ST Employees Congress: मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) पीएफ आणि ग्राज्युटीचे (Gratuity) 1500 कोटी रुपये पुन्हा थकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच, पीएफ (PF) आणि ग्रॅज्युटीसाठी सरकारनं सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम अडव्हांस  द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संप काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणि एसटीच्या खर्चाला लागणारी रक्कम चार वर्ष  देण्याचं न्यायालयानं नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीनं मान्स केलं होतं. पण, अद्याप ही रक्कम देण्यात आलेली नाही, असंही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना संप काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणि एसटीच्या खर्चाला लागणारी रक्कम चार वर्ष देण्याचं न्यायालयानं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं सरकारच्या वतीनं न्यायालयात मान्य केलं होतं. पण ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. सध्या फक्त सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत असून, ती पण तोडून-तोडून देण्यात येत आहे. त्यामुळे गेले अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि उपदान या दोन्ही रक्कमांचा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल हिस्सा ट्रस्टकडे भरण्यात आलेला नाही. साहजिकच ट्रस्टला मिळणारं, त्या रक्कमेवरील व्याज बुडालं असून या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्यानं ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरची देणी मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे सरकारनं सवलत मूल्य रक्कम ही दर महिन्याला एसटीकडून प्रस्ताव गेल्यानंतर न देता एसटी महामंडळाला अॅडव्हांस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे.

भविष्य निर्वाह निधी आणि उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो. पण कर्मचाऱ्यांकडून कपात करण्यात आलेल्या रक्कमेचा हिस्सा गेले अनेक महिने ट्रस्टकडे भरणा केला नसून ही रक्कम अंदाजे 1500 रुपये इतकी झाली आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्यानं गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे कोट्यवधी रुपयांचे व्याज ट्रस्टला मिळालेलं नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्टसुद्धा अडचणीत सापडल्या आहेत. या गोत्यात आल्या आहेत, असं म्हंटले तरी वावगं ठरणार नाही. ही रक्कम ट्रस्टकडे वेळेत भरणा करण्यात आली नाही तर भविष्यात या रक्कमेतून दिली जाणारी एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नंतरची देणी देण्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकार सध्या देत असलेली सवलत मूल्य रक्कम ही तोडून तोडून न देता ती रक्कम ऍडव्हांस म्हणून दिल्यास हा मुद्दा निघेल असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, त्यामुळे वर्षभराची होणारी एकूण साधारण 4400 कोटी रुपये इतकी सवलत मूल्य रक्कम सरकारकडून आगाऊ दिल्यास हा मुद्दा निकाली निघेल. तरी वर्षभराची सवलत मूल्य रक्कम सरकारनं एसटीला आगाऊ द्यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Embed widget