एक्स्प्लोर
प्लास्टिकबंदीवरुन सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस
प्लास्टिक नाही, मग पर्याय काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यातच, सोशल मीडियावर सध्या प्लास्टिकबंदीवरुन तुफान जोक्स व्हायरल होत आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात आजपासून (23 जून) प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांनी प्लास्टिकबंदीचं स्वागतही केलंय. मात्र काही ठिकणी नाराजीही दिसून येत आहे. प्लास्टिक नाही, मग पर्याय काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यातच, सोशल मीडियावर सध्या प्लास्टिकबंदीवरुन तुफान जोक्स व्हायरल होत आहेत. निवडक जोक्स : नवीन धमकी... तू नुस्ता गाडी पार्क कर... नाही तुझ्या हॅण्डलला कॅरी बॅग अडकवली तर बघ.... ---------------------- आधी तांदळाच्या डब्यातल्या नोटा काढायला लावल्या. आता गादीखालच्या पिशव्या... ---------------------- बरं झालं,प्लास्टिकबरोबर काचेवर बंदी नाही आली ती.. नाहीतर दारूच्या दुकानावर तांब्या घेऊन जायला लागलं असतं मी पीत नाही, पण मित्रांची काळजी ---------------------- Plastic surgery वाल्यांनी काय करायचं? दंड नाही ना आकारणार ---------------------- आमच्याकडे प्लॅस्टिक पिशव्यांना कापडी कव्हर लावून मिळेल. स्थळ: अर्थातच पुणे. ---------------------- आज कोनी ५००० रुपये* ज़र दंड मागितला तर त्याला सांगा सरकार ने दिलेल्या १५ लाखा मधुन कापून घे... ---------------------- नवीन पुणेरी पाटी गेट समोर गाडी लावल्यास, हँडलला प्लॅस्टीकची पिशवी लावण्यात येईल ! ---------------------- नोटबंदी प्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या ही बदलुन मिळाव्यात. ---------------------- मला दूध घ्यायचे आहे कागदात बांधून मिळेल का ---------------------- प्लास्टिक बंदीवरील कविता प्लाश्टिकबंदी कदमांच्या त्या रामदासान, दाखयल्यान् बग हिंमत! पुना इली मागारणीकच, "भायरच्या"पक्षी किंमत! प्लाश्टिक काय ता बंद झाला, कापडी पिशी इली! टेलराकडे उरल्या कापडाक, मागणी सुरु झाली! शिलाईच्यो मशनी पुना, बंद जोडूक लागल्यो! पिशयेवरच्यो जायराती, बंद होवक लागल्यो! प्लाश्टिकातसून सुकटाचो, वास खय लपता! शेजारचो भट म्हणता, जादा जेवाण खपता! बटाट्याच्या भाजयेतला मग खोबरा वाटता गोलम्यासारा! खरा खय परवडता मग, नुसत्या वासान वाटता बरा! अक्को देश तुंबवतंत त्या, बॅनरवरच बंदी नाय! राजकारण्यांच्या अकलेएवढी, जगात कसली मंदी नाय! प्लाश्टीक गेला,कापडी ईला, बेतान वापरूक शीक! पिशयेभायर येवन लागता, कपड्याक सगळो डीक! कमरेक कापाड चिटाकला ता, घराक इल्यार सुटता खय! बरा झाला,गाटी मारूक, आता ताकद ऱ्हवली खय? कापडी पिशी फाटली तर, शिवक येता पुना! नवीन शिवची झाली तर, कापाड चालता जुना! जरा धको लागलो तर, प्लाश्टीक कायता फाटता! कदमीणीच्या सोईसाटीच, कायदो ईलो वाटता! एटीयम कार्ड प्लाश्टिक म्हणान् पोलिस मागता पाच हजार! मेल्या,माजा खाता बग, त्येचार नाय एक हजार! बंदी येयत बंदी जायत, प्लाश्टीक ऱ्हवात चालू! खय मोरी चोंदलीच तर, दांडोच भुतूर घालू! जरा ढोसल्यासारक्या केल्यार, गटार पुना व्हावता! कापडी पिशयेत प्लाश्टीक पिशवी, कोण कोणाक गावता! प्रमोद जोशी. देवगड
आणखी वाचा























