26 january : पालकमंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना धक्का? आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण, कोण कुठे ध्वजारोहण करणार?
Republic Day : मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सिंधुदुर्गमध्ये तर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोलापूरमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
![26 january : पालकमंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना धक्का? आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण, कोण कुठे ध्वजारोहण करणार? Flag hoisting in Raigad by Aditi Tatkare know detail about who will hoist flag in districts maharashtra 26 january republic day marathi news 26 january : पालकमंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना धक्का? आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण, कोण कुठे ध्वजारोहण करणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/24/1688c71b02904f05a20c866ba986cf4a170609989785693_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.15 वाजता होणार आहे. त्यामध्ये रायगडचे ध्वजारोहण हे मंत्री आदिती तटकरेंच्या (Aditi Tatkare) हस्ते होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना पुन्हा एकदा धक्का बसल्याचं दिसून आलंय.
मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8.30 ते 10 वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय, अर्धशासकीय समारंभ आयोजित करून नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल, त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजेच्यापूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर करावा अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
कोण कुठे ध्वजारोहण करणार?
मुंबई येथील शिवाजी पार्क, दादर येथे राज्यपाल रमेश बैस हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील.
विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पुढील प्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, मंत्री ध्वजारोहण करतील.
- देवेंद्र फडणवीस- नागपूर,
- अजित पवार- पुणे,
- राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर,
- सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर,
- दिलीपराव वळसे पाटील- बुलढाणा,
- डॉ. विजयकुमार गावित- भंडारा,
- हसन मुश्रीफ- कोल्हापूर,
- अब्दुल सत्तार- हिंगोली,
- चंद्रकांत पाटील- सोलापूर,
- गिरीश महाजन- धुळे,
- सुरेश खाडे- सांगली,
- तानाजी सावंत- धाराशीव,
- उदय सामंत- रत्नागिरी,
- दादाजी भुसे- नाशिक,
- संजय राठोड- यवतमाळ,
- गुलाबराव पाटील- जळगाव,
- संदिपान भुमरे- छत्रपती संभाजीनगर,
- धनंजय मुंडे- बीड,
- रवींद्र चव्हाण- सिंधुदुर्ग,
- अतुल सावे- जालना,
- शंभूराज देसाई- सातारा,
- मंगल प्रभात लोढा- मुंबई उपनगर,
- धर्मरावबाबा आत्राम- गोंदिया,
- संजय बनसोडे- लातूर,
- अनिल पाटील- नंदुरबार,
- दीपक केसरकर- ठाणे,
- आदिती तटकरे- रायगड.
इतर विभागीय आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, तथापि राष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.
राज्यात या दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारावेत असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)