एक्स्प्लोर

Nilgai News : पाण्याच्या शोधात पाच निलगायी पडल्या विहिरीत, चार निलगायींना बाहेर काढण्यात यश

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळं पाण्याच्या शोधात असलेल्या पाच निलगायी या विहिरीत पडल्याची घटना घडली.

Nilgai News : राज्यात सद्या मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकांना उन्हाचा त्रास होत असताना प्राण्यांना देखील वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळं पाण्याच्या शोधात असलेल्या पाच निलगायी या विहिरीत पडल्याची घटना घडली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कोरवाडी याठिकाणी ही घटना घडली. यातील चार  निलगायींना गावकऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले असून, एका निलगायीचा मृत्यू झाला आहे.
 
दरम्यान, उन्हाचे चटके सर्वांनाच बसू लागले आहेत. त्यातच उन्हाचा फटका हा वन्य प्राण्यांना देखील बसत आहे. पाण्याच्या शोधात 5 निल गायी या विहिरीत पडल्या होत्या. यातील 4 निलगायींना गावकऱ्यांना बाहेर काढले आहे. मात्र, एका निलगायीचा मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या जिंतुर तालुक्यातील कोरवाडी येथे घडलीय. उन्हाचा पारा वाढला असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात आहेत. जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारातील शिवाजी बनसोडे यांच्या शेतामध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या पाच निलगाई विहिरीत पडल्या. याबाबतची माहिती सरपंचांनी तत्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. गावकऱ्यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी  विहिरीतून निलगाई वर काढल्या. मात्र एका निलगाईचा दुर्देवी मृत्यू झाला.

दरम्यान, राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही असे चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान हे 40 अंशाच्या पुढे आहे. तर काही जिल्ह्यात 42 अंश ते 43 अंश तापमानाची नोंद देखील झाली आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास नागरिकांसह प्राण्यांना देखील होत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे.  उष्णतेची लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचं टाळले. एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे ते नागरिक उन्हापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Sudhirdas Pujari on Raj Thackeray: गणपतीत दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार; म्हणाले...
गणपतीत दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार; म्हणाले...
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Pune Crime News: मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray: मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Raj Thackeray: देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
Embed widget