एक्स्प्लोर
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मासे महागले, आवक घटली
आधी तुम्ही जे मासे खात होता, आता त्याच माशांसाठी तुम्हाला दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे. थंडीमुळे माश्यांची आवक 70 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे मायांच्या किमती वधारल्या आहेत. यामुळे खवय्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
मुंबई : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मासे मात्र महागले आहेत. थंडीमुळं माशांची आवक 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळं माशांच्या किंमतीत दुपटीनं वाढ झाली आहे. कोलकाता ओरीसा, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटकसह इतर राज्यातूनही मासे महाराष्ट्रात आयात केले जात आहेत. त्यामुळं नववर्षाच्या स्वागताला मात्र माशांचा भार ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.
मुंबईमध्ये माशांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आधी तुम्ही जे मासे खात होता, आता त्याच माशांसाठी तुम्हाला दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे. थंडीमुळे माश्यांची आवक 70 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे मायांच्या किमती वधारल्या आहेत. यामुळे खवय्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
हे मासे कोलकत्ता, ओरिसा, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटकसह इतर राज्यातून येतात. 500 ग्राम पापलेटची किंमत जी आधी 1 हजार रु होती ती आता 1300 रु झाली आहे. तसेच हलवा आधी 250 रु तर आता 500 रु, रावस आधी 300 रु तर आता 500 रु, बोंबील आधी 50 ते 60 रु होते आता 120 रु झाले आहेत, सुरमई आधी 200 रु तर आता 400 रु झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement