एक्स्प्लोर

आधी रस्त्याची स्वच्छता, मग मिरवणूक, लातुरातील गणेश मंडळाचा उपक्रम

गणपती बाप्पा उत्सवाचा अन् उत्साहाचा सण असला, तरी या माध्यमातूनही अनेकजण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असतात. कुणी मदत करत असतो, तर कुणी स्वत: सक्रीयपणे काम करत असतो.

लातूर : गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर फुलं, गुलाल यांसह अनेक गोष्टींमुळे अस्वच्छता निर्माण होते. हे लक्षात घेऊन लातुरातील औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललं. विसर्जनासाठी शेवटचा मान असलेल्या लातुरातील या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्ग स्वच्छ करुन गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ गेली पाच वर्षे हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. गणेशोत्सव उत्सवाचा अन् उत्साहाचा सण असला, तरी या माध्यमातूनही अनेकजण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असतात. कुणी मदत करत असतो, तर कुणी स्वत: सक्रीयपणे काम करत असतो. लातुरातील औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने सक्रीयपणे काम करुन, आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. आधी रस्त्याची स्वच्छता, मग मिरवणूक, लातुरातील गणेश मंडळाचा उपक्रम लातूर शहरातील शेवटचा मानाचा गणपती असलेल्या औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला रात्री 10 वाजता मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य असंय की, सर्वात उशिरा येथील विसर्जन मिरवणूक सुरुवात होते. मंडळाचे हे 48 वं वर्ष आहे. दक्षिणेकडे तोंड करुन असलेल्या या गणपतीला ‘दक्षिणेश्वर गणेश’ या नावाने ओळखले जाते. या वेगळेपणाला शोभेल असे काम मंडळाने गेल्या पाच वर्षापासून हाती घेतले आहे. विसर्जनादिवशी मिरवणुकीदरम्यान मंडळाचे सर्व सदस्य हे स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्ग चकाचक करतात. यासाठी मंडळाचे पदाधिकारी हे स्वत: मार्ग स्वच्छ करतात. त्याच्यापूर्वी झालेल्या विसर्जन मिरवणुकीतील सर्व कचरा हे मंडळ गोळा त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावतात. त्यानंतरच त्याच्या गणेशाचे विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होते. दक्षिणेश्वर गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानंतरही इतर वेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget