एक्स्प्लोर
जुन्या वादावरून दोन गटांमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू
अमरावती शहरातील आझादनगरमध्ये जुन्या वादातून केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून या गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत.
अमरावती : अमरावती शहरातील आझादनगरमध्ये जुन्या वादातून केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून या गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत.
अन्सार शहा जमील शहा असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून दोन गट समारासमोर आले. शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यातच एका गटाने देशी कट्ट्यातून फायर केल्याने अन्सारचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहे.
दुचाकी वाहनाच्या हॉर्न वाजवण्यावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेची चौकशी केली असून आरोपींचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement