एक्स्प्लोर
नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सेमिनरी हिल्स परिसरात आग

नागपूर: नागपुरातील सेमिनरी हिल्स जंगलात मोठी आग लागली होती. संध्याकाळी 7.30च्या सुमारास अचानक या भागात आगीचे लोळ दिसू लागले. जंगलाचा मोठा भाग या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सेमिनरी हिल्सला लागून आहे. अग्नीशमनदलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. तर दुसरीकडं गोंदियातील देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सहा लगतच्या महाराष्ट्र वन विकास मंडळाच्या लाकूड आगाराला मोठी आग लागली. तब्बल 5 एकरमध्ये असलेल्या लाकडाला आग लागल्यानं मोठं नुकसान झालं. दरम्यान, या दोन्हीही ठिकाणच्या आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा सध्या तपास सुरु आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























