एक्स्प्लोर
तरुणाचे अश्लील मेसेज, बापलेकीचा आत्महत्येचा प्रयत्न
सांगली : सांगलीत तरुणाच्या अश्लिल मेसेजला कंटाळून बाप-लेकीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. कुपवाड पोलिस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला.
आरोपी संदीप सुर्वे आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. मात्र संदीपची गुन्हेगारी प्रवृत्ती पाहून पीडित मुलीनं अचानक लग्नास नकार दिला.
घरच्यांनी तिच्यावर बळजबरी करत नकार देण्यास भाग पाडल्याचा आरोप संदीपने केला. त्यामुळे पोलिसांनी दोघांना बोलावून त्यांची समजूत काढली. पण त्यानंतरही आरोपीनं मुलीला अश्लिल मेसेज पाठवले.
मेसेजमुळे त्रस्त झालेल्या मुलीनं आणि तिच्या वडिलांनी थेट कुपवाडा पोलिस ठाण्यातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला असून पोलिसांनी आरोपी संदीपला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement