एक्स्प्लोर

पुण्यात भीषण अपघातात 2 ठार; नाशिकमध्येही बस-कारची धडक, 2 महिलांचा मृत्यू

राज्यात एकीकडे पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असताना, दुसरीकडे पुणे व नाशिकमध्ये भीषण अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत.

पुणे : अपघाताच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. कधी रस्ते अपघात (Accident), तर कधी रेल्वे अपघाताच्या घटना घडत असून रस्त्यांवरील खड्डे तसेच, ओव्हरस्पीड गाड्या हे रस्ते अपघाताचे मुख्यत्वे कारण असल्याचं दिसून येतं. आता, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. या भीषण अपघातात 4 जणांना मृत्यू झाला आहे. पुण्यात (pune) नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा येथे लक्झरी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. तर, नाशिकच्या (Nashik) दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळही बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता. 

राज्यात एकीकडे पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असताना, दुसरीकडे पुणे व नाशिकमध्ये भीषण अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन विविध ठिकाणच्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर दोन्हीही गाड्यांनी अचानक पेट घेतल्यामुळे सगळ्यांची दमछाक झाली होती. बसने पेट घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या कारला पाचारण करण्यात आले, पण तोपर्यंत आगीत बस आणि कर जळून खाक झाली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाल्याची माहिती आहे. 

पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावरही लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. आळे फाट्यावरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसची समोरुन येणाऱ्या कारला समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये, कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून रिया गायकर व कुसुम शिंगोटे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं. मात्र, या अपघात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा नामा केला आहे. 

हेही वाचा

ट्रेकर्सला घट्ट बिलगली, दोरीला धरुन वर आली; पुण्यातील तरुणी 100 फूट दरीत पडली, सुदैवाने बचावली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  

Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्टABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024Disha Salian Aditya Thackeray Majha Mudda EP 4 : वकिलाचे दावे ते ठाकरेंवर आरोप; काय आहे प्रकरण?Aaditya Thackeray Chandrashekhar Bawankule Meet : आदित्य ठाकरे-बावनकुळे यांची विधान भवनात भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका

हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला

बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये

नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर

Embed widget