एक्स्प्लोर

ट्रेकर्सला घट्ट बिलगली, दोरीला धरुन वर आली; पुण्यातील तरुणी 100 फूट दरीत पडली, सुदैवाने बचावली

धबधबा बंद असल्याने निसर्ग पर्यटनाची निराशा झाली होती, पण परतीच्या प्रवासादरम्यान तोच आनंद घेण्यासाठी या मित्रांच्या ग्रुपने बोरणे घाटात गाडी थांबवली.

सातारा : सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी 100 फूट खोल दरीत पडली, पण पोलीस आणि स्थानिक ट्रेकर्संच्या मदतीने अथक प्रयत्नांची पराकाष्टा केल्यामुळे सुदैवाने बचावली. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत धबधब्यावर फिरायला आलेली तरुणी, बोरणे घाटात कशी पडली? हा अपघात कसा झाला? तिला कुणी वाचवलं हा सगळाच घटनाक्रम थरारक आहे. नसरीन कुरेशी असं या 29 वर्षीय तरुणीचं नाव असून ती पुण्यातील (Pune) रहिवासी आहे. 03 ऑगस्ट रोजी पावसातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नसरीन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर (Waterfall) फिरायला गेली होती. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने साताऱ्यातील (Satara) ठोसेघर धबधबा बंद असल्यानं नसरीन आणि तिच्या ग्रुपने मागे परतण्याचा निर्णय घेतला. 

धबधबा बंद असल्याने निसर्ग पर्यटनाची निराशा झाली होती, पण परतीच्या प्रवासादरम्यान तोच आनंद घेण्यासाठी या मित्रांच्या ग्रुपने बोरणे घाटात गाडी थांबवली. सर्वजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले. हिरवागार निसर्ग पाहून नसरीनलाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला आहे. नसरीन सेल्फी फोटो काढत होती. मात्र , तेवढ्यात पावसाच्या संततधारेमुळे ओलीव झालेल्या येथील घाटाच्या कठाडावरुन नसरीनचा पाय घसरला. नसरीन 100 फूट दरीत कोसळली. सुदैवाने, काळ आलेला पण वेळ आली नव्हती असंच नसरीनसाठी घडलं. खोल दरीत कोसळून नसरीन थोडक्यात बचावली. एका झाडाचा आधार घेऊन ती कशी बशी जीव मुठीत धरुन होती. नसरीनच्या मित्रांनी स्थानिक पोलिसांना घटनेबाबत कळवलं. पोलिसांनी तात्काळ बचावकार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली. त्यानंतर, पोलिस, ट्रेकर्स आणि होमगार्डच्या टीमने तातडीने बोरणे घाटात जाऊन मदतकार्य सुरु केलं. 

होमगार्ड अविनाश मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढले. या दुर्घेटनेत नसरीन गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

पर्यटनाचा आनंद घेताना काळजी घ्या

दरम्यान, नुकताच सोशल इन्फ्लुएंसर आन्वी कामदार हिचा सेल्फीच्या नादात दरीत पडून मृत्यू झाला होता. पावसाळ्यात धबधब्यांवर जाण्याकडे पर्यटकांचा कौल असतो. पण अशा ठिकाणी जाताना सुरक्षित अंतरावरुन निसर्गाचा आनंद घेणं गरजेचय. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो. निसरड्या रस्त्यावरुन तुम्ही घसरु शकता. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घेण गरजेचं आहे. कारण, थोडीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. आपला निसर्ग पर्यटनाचा आनंद आपल्या स्व‍कीयांच्या दु:खाचे कारण ठरता कामा नये. 

हेही वाचा

बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवि राणांनी डिवचलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
Embed widget