एक्स्प्लोर
शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच : अर्थमंत्री
![शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच : अर्थमंत्री Farmers Strike Means Mothers Strike Says Finance Minister Sudhir Mungantiwar Latest Updates शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच : अर्थमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/01161944/Sudhir-Mungantiwar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड : आई संपावर जाणे आणि शेतकरी संपावर जाणे सारखेच आहे. शेतकरी संपावर गेला, ही बाब आमच्या सरकारसाठी भूषणावह नाही, अशा भावना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. नांदेडमध्ये ते एबीपी माझाशी बोलत होते.
“आजवर राज्यात शेतकरी हिताच्या धोरणांची गती अत्यंत धीमी होती. पण मागील अडीच वर्षांच्या काळात ही गती वाढली. कर्जमुक्तीऐवजी भविष्यात शेतकरी कधीच कर्जाच्या दुष्टचक्रात अडकू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.” असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
बळीराजाच्या संपामुळे शहरातील जनता गॅसवर
दुसरीकडे शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसं मिळणार या प्रश्नामुळे अशा अनेक प्रश्नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे.
संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी
- शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा
- शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)