शेतकऱ्यांची सरकार, विमा कंपन्यांकडून थट्टा; गाजावाजा करत 1 रुपयांत पिक विमा, पण खात्यात भरपाई केवळ 70 रुपये
Pik Vima Yojana: सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रूपयांत विमा जाहीर केला. मात्र , शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपये नुकसान भरपाई मिळाल्याचं समोर.
![शेतकऱ्यांची सरकार, विमा कंपन्यांकडून थट्टा; गाजावाजा करत 1 रुपयांत पिक विमा, पण खात्यात भरपाई केवळ 70 रुपये Farmers ridicule from government and insurance companies; Crop insurance for Rs 1 but compensation in account is only Rs 70 Maharashtra Government Pradhanmantri Pik Vima Yojana शेतकऱ्यांची सरकार, विमा कंपन्यांकडून थट्टा; गाजावाजा करत 1 रुपयांत पिक विमा, पण खात्यात भरपाई केवळ 70 रुपये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/ea202c54e0ea1abd074fda160df937c3171946343258488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Government Pik Vima Yojana : छत्रपती संभाजीनगर : सरकारनं (Government) मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी (Farmers) 1 रूपयांत विमा (Pik Vima) जाहीर केला. पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत (Compensation To Farmers) फरक पडलेला नाही. छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पिकविम्याचे 70 रूपये आलेत. पण त्यासाठी बँकेत बॅलन्स एक हजार रूपये ठेवावे लागत आहेत.
घडलेल्या प्रकराची प्रशासकीय पातळीवरुन कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्याला 70 ते 80 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आल्याचं पाहायला मिळालं. शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती यात मेताकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची सरकार आणि विमा कंपन्यांनी थट्टा केलीये, असंच एकंदरीत चित्र दिसतंय.
पीकविम्याचे 70 रुपये आलेत, ते काढण्यासाठी बँक खात्यात हजार रुपये टाकावे लागतील : शेतकरी
छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्यानं बोलताना सांगितलं की, "पीकविम्याचे 70 रुपये आले आहेत. पण, खात्यातले पैसे काढण्यासाठी 1000 रुपये बॅलन्स खात्यात ठेवावा लागतो. पीक विमा खात्यात जमा झाल्यानं खात्यातील बॅलन्स 500 रुपये झालं आहे. विम्याचे 70 रुपये काढण्यासाठी अगोदर 500 रुपये टाकावे लागतील, आता हे 500 रुपये आणून कुठून. असाही प्रश्न एका शेतकऱ्यानं उपस्थित केला आहे.
विम्याच्या 73 रुपये 71 पैशांचं काय करू? तीन मजली माडी बांधू? संतप्त शेतकऱ्याचा सरकारला सवाल
भरत कारभारी तुपे हे वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी. त्याची दोन एकर शेती आहे. त्यापैकी एका एकरावर या शेतात त्यांनी मागील वर्षी मका लावली होती. मका पिकाला त्यांना साधारणत: एकरी 30 हजार रुपये खर्च आला. मात्र, त्या पिकांचं नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी झालं. त्यातच भावही कमी मिळाला. त्यांना पिक विकून 14 हजार 400 रुपये आले. म्हणजेच, त्यांना 15 हजार 600 रुपयांचा तोटा झाला. झालेल्या नुकसानाची त्यांनी तक्रारही केली होती. मात्र, विम्याचे 73 रुपये 71 पैसे त्यांच्या खात्यावर पडल्याचा मॅसेज आला. या पैशांचं काय करू? तीन मजली माडी बांधू का? असा प्रश्न त्यांनी थेट सरकला उपस्थित केला आहे.
दरम्यान, पाऊस नसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सराकरनं मोठ्या थाटामाटात चिंतेनं ग्रासलेल्या बळीराजासाठी एक रुपयांत विमा जाहीर केला होता. पण, छत्रपती संभाजीनगरातल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आलेले पैसे पाहून. सरकारनं शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)