एक्स्प्लोर

कृषी पंप वीज धोरणाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद, 3 लाख शेतकऱ्यांनी भरले 312 कोटी रुपये थकबाकी

दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मुळ थकबाकीवर 30 टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे.

मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी 312 कोटी 41 लाख रुपये आजपर्यंत भरले आहे.

या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडील सुमारे 15 हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ही योजना तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 50 टक्के सवलत मिळणार असून व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास 66 टक्के सवलत मिळणार आहे.

केंद्राच्या 'त्या' प्रस्तावामुळं गरीब, मध्यमवर्गीयांसाठी वीज ही चैनीची वस्तू ठरेल; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची टीका

दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मुळ थकबाकीवर 30 टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर 2015 नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे.

गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी 33 टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधावर खर्च करण्याची अतिशय महत्वपूर्ण तरतूद या धोरणात आहे. पुढील 3 वर्षात शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

महावितरणची प्रादेशिक विभागनिहाय वसुली

  • पुणे : 138 कोटी 91 लाख रुपये
  • कोकण : 95 कोटी 73 लाख रुपये
  • औरंगाबाद : 59 कोटी 37 लाख रुपये
  • नागपूर : 18 कोटी 39 लाख रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget