एक्स्प्लोर
15 दिवसांपासून वीज नसल्याने पालघरमधील शेतकरी हैराण
वीज महावितरण विभाग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे. नानिवाली गावाला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर एमएसईबीचे कर्मचारी घेऊन गेले ते परत आलेच नाही.

पालघर : शेतकरी वाचला पाहिजे म्हणून एका बाजूला सरकार नवनवीन योजना राबवतं, तर दुसऱ्या बाजूला मात्र महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पालघरमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पालघरमधील नानिवाली येथे पंधरा दिवसांपासून वीज नसल्याने हाताशी आलेलं भाजीपाल्याचं पीक पंपाने पाणी न दिल्याने कोमजून गेल आहे .
पालघरमधील ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या गंभीर असल्याने या भागातील शेतकरी दुबार पीक घेतो. यात पालेभाज्यांचा समावेश असून वर्षभर हेच त्यांचे उत्पन्नाच साधन आहे. नानिवली येथील अनेक शेतकरी जानेवारी महिन्याच्या सुमारास गलका, दुधी, चवळी, गवार यांची लागवड करतात. यात त्यांना मे महिन्यापासून उत्पन्न येण्यास सुरुवात होते. यावर्षी बहरही चांगला आला होता. मात्र यावर्षी गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून गावात वीज नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्यांच्या वाडीतील रोप कोमेजून गेली आहेत. वर्षाचं उत्पन्न देणारं पीक हातचं गेल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
वीज महावितरण विभाग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे. नानिवाली गावाला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर एमएसईबीचे कर्मचारी घेऊन गेले ते परत आलेच नाही. गेल्या पंधरा दिवसात अनेकवेळा तक्रार करुनही एमएसईबी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतो आहे.
पालघरमधील ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या गंभीर असल्याने या भागातील शेतकरी दुबार पीक घेतो. यात पालेभाज्यांचा समावेश असून वर्षभर हेच त्यांचे उत्पन्नाच साधन आहे. नानिवली येथील अनेक शेतकरी जानेवारी महिन्याच्या सुमारास गलका, दुधी, चवळी, गवार यांची लागवड करतात. यात त्यांना मे महिन्यापासून उत्पन्न येण्यास सुरुवात होते. यावर्षी बहरही चांगला आला होता. मात्र यावर्षी गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून गावात वीज नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्यांच्या वाडीतील रोप कोमेजून गेली आहेत. वर्षाचं उत्पन्न देणारं पीक हातचं गेल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
वीज महावितरण विभाग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे. नानिवाली गावाला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर एमएसईबीचे कर्मचारी घेऊन गेले ते परत आलेच नाही. गेल्या पंधरा दिवसात अनेकवेळा तक्रार करुनही एमएसईबी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतो आहे. आणखी वाचा