एक्स्प्लोर
मंगळसूत्र गहाण ठेवून बैलाला वाचवण्याचे प्रयत्न अखेर अपयशी
एका तरुण शेतकऱ्याने आपला बैल आजारी असल्याने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसंगी पैशांअभावी मंगळसूत्र गहाण ठेवून औषधे खरेदी केली. बैलावर उपचार केले, पण दुर्दैवाने बैलाने या जगाचा निरोप घेतला.
![मंगळसूत्र गहाण ठेवून बैलाला वाचवण्याचे प्रयत्न अखेर अपयशी farmer failed to save his bull struggled to buy medicine मंगळसूत्र गहाण ठेवून बैलाला वाचवण्याचे प्रयत्न अखेर अपयशी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/21152644/nanded-ox.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड : बळीराजासाठी बैल, गाय हे त्याचे सच्चे साथीदार. या जनावरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होतोच, शिवाय जोडधंदाही मिळतो. असेच एका तरुण शेतकऱ्याने आपला बैल आजारी असल्याने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसंगी पैशांअभावी मंगळसूत्र गहाण ठेवून औषधे खरेदी केली. बैलावर उपचार केले, पण दुर्दैवाने बैलाने या जगाचा निरोप घेतला.
वाघमारे परिवाराच्या गोठ्यात आज निरव शांतता पसरली आहे. हा गोठा एका बैलाचा हक्काचा होता. इथे तो बैल विश्रांती घ्यायचा, चारा खायचा. पण अचानक त्याचे पोट फुगले, बैल तडफडू लागला, चारा खाणे कमी झाले... वाघमारे परिवार त्यामुळे अस्वस्थ झाला. बैलावर घरी डॉक्टर बोलवून उपचार केले. गोठ्यात पडलेली औषधी त्याची साक्ष देते. पण बैलाची तब्येत खालावत गेली. अखेर बैलाला लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.
वाघमारे यांचे गाव नांदेड जिल्ह्यातील कुंद्राळा.. बैलाला उपचार करण्यासाठी त्यांनी लातूर जिल्ह्यात उदगीर येथील सरकारच्या पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयात नेले. कुंद्राला येथून उदगीरला जाण्यासाठी रिक्षाचालकाने चार हजार रुपये भाडे घेतले.
डॉक्टरांनी या बैलाचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगत वाघमारे यांच्या हातात लांबलचक औषधांची यादी दिली. अमोल वाघमारे हा आपल्या मावशीसोबत नजीकच्या मेडिकलमध्ये गेला. औषधांचे बिल झाले साडेतीन हजार रुपये. पण अमोलच्या खिशात केवळ दोन हजार रुपये होते.
बैलाला काहीही करून वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला होता. मावशीने पैसे कमी पडत असल्याने मेडिकल चालकाला स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. त्यानंतर मेडिकल चालकाने औषधी दिली. अखेर बैलाचे ऑपरेशन झाले.
एवढे सगळे कष्ट घेऊन आज त्या बैलाने या जगाचा निरोप घेतला. पण प्रश्न असा आहे, की शासकीय दवाखान्यात शासनाकडून सध्या हॅन्ड ग्लोजचा पुरवठा नाही का? पशुवर उपचार करण्यासाठी औषधींचा पुरवठा नाही का? जर शासनाने सर्व काही पुरवठा करून दिला असेल तर मग एखाद्या शेतकरी कुटुंबाला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून औषधं का आणावी लागतात हा प्रश्न आहे. आता तरी सरकारने या प्रकरणांची गंभीर दाखल घेऊन दोषींवर कारवाईचे करण्याची गरज आहे. जेणेकरुन इतर शेतकऱ्यांवर अशी दुर्दैवी वेळ येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)