एक्स्प्लोर

देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस? RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा

Pune Fake IAS Story : देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस (Bogus IAS) असल्याचा दावा पुण्यातील RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

Pune News पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वतोमुखी चर्चेचा विषय झालेल्या पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणानंतर असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस (Bogus IAS) असल्याचा दावा RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. एवढेच नाही तर या 22 अधिकाऱ्यांची नावे असणारी एक डॉक्युमेंट UPSC FILES नावाने सोशल मीडियावर फिरत असून ती यादी देखिल विजय कुंभार यांनी समोर आणली आहे.

याबाबत UPSC आयोगाला पत्र लिहून, या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या अधिकार्‍यांना ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. या 22 मधील पुणे शहरातील एक अधिकारी असून राज्यातील देखील एकूण चार अधिकारी असल्याचा दावा केला जातोय.  इतकच नाही तर हे सर्व आधिकारी राज्यात IAS, IPS आणि IRS म्हणून कार्यरत असल्याचेही विजय कुंभार यांनी सांगितलंय.

यूपीएससीतील गैरप्रकार म्हणजे देशाविरुद्ध एकप्रकारे युद्धच

मध्यंतरी पूजा खेडकर यांचे उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर अशाच प्रकारचे काही प्रकरण उजेडात आले आहेत. अनेकांनी त्याबाबत तक्रार देखील दिल्या आहेत. त्यातील काही नाव सोशल मीडियामध्ये देखील पुढे आलेली आहे. त्यातीलच एक फाईल म्हणजे यूपीएससी फाईल ही आहे. त्यात एकूण 22 यूपीएससीच्या अधिकाऱ्यांची नावे आहे. ज्यामध्ये  या कथित अधिकाऱ्यांनी खोटी जात प्रमाणपत्र, खोटे उत्पन्नाचे दाखले, किंवा बनावट उत्पन्नाचे दाखले, बनावट डिसेबिलिटी सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखल करून त्यांनी नोकरी मिळवली आहे.

या संदर्भामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांची माहिती घेतली असता या संदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. यातील चौकशी करून दोशींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी पत्राद्वारे केली असल्याची माहिती ही विजय कुंभार यांनी दिली आहे. 

हे प्रकरण पाहता देशाविरुद्ध एकप्रकारे युद्ध सुरू असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे. कारण आयएएस ही देशातील सर्वोच्च परीक्षा असून सर्वात सुरक्षित अशी परीक्षा मानली जाते. इथून निवडून येणारे अथवा इथून परीक्षा पास करून येणारे अधिकारी देशातील एका महत्त्वाचे पद भूषवतात आणि अनेक निर्णय घेतात. त्यामुळे अशा परीक्षांमध्ये कुठल्याही उणीवांना स्थान नाही. त्यामुळे संबंधित प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता आशांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही  आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. 

चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी 

अलीकडे उघडकीस येणारे गैरप्रकार लक्षात घेता या सर्व प्रकाराचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतो आहे. या संपूर्ण प्रकारात काही प्रकरण असे देखील आहे की त्यांनी दिव्यांग असल्याचे बनावट सर्टिफिकेट जमा केले आहे आणि त्यानंतर त्यांचेच काही व्हिडिओ समाज माध्यमांवर नाचताना दिसले आहेत. इतका गंभीर प्रकार हा अद्याप कुणाच्याही लक्षात आला नाही, असं म्हणता येणार नाही. तर हे प्रकरण काहींच्या लक्षात आले असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्या असल्याचं पण बोलायला जागा आहे.

यात अनेक पदांची अशाच प्रकारे निवड झाल्याचेही  विजय कुंभार म्हणाले. एकट्या महाराष्ट्रात अशा प्रकारची चार प्रकरण उजेडात आली आहे. ही लोक राज्यात काम करत नसली तरी ते राज्याबाहेर काम करत आहेत. त्यामुळे यूपीएससीने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यात हस्तक्षेप करून वेळीच यावर कारवाई करून योग्य ते पाऊल उचलावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहेत. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहनNagpur Violance : आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, दोघं जखमीNagpur Violence : नागपूरमधील शिवाजी चौकात दोन गटात राडा, पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचा प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget