एक्स्प्लोर

Raigad Building Collapse | 19 तासांनंतर चिमुकला मोहम्मद ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर; टाळ्यांचा कडकडाट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा

Raigarh Buidling Collapse Rescue Operation | रायगडच्या महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तब्बल 19 तासांनी चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. यावेळी तिथे टाळ्यांच्या कडकडाट झाला. शिवाय गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.

रायगड : 'देव तारी त्याला कोण मारी', याचा प्रत्यय रायगडमधील इमारत दुर्घटनेच्या बचावकार्यादरम्यान आला. महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून लहान मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तब्बल 19 तासांनंतर साडेतीन वर्षांच्या मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलं. यावेळी सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला. टाळ्यांच्या कडकडाट झाला. शिवाय गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.

एनडीआरएफच्या जवानांना दोन पिलरमध्ये एक पाय हलताना दिसला. एका जवानांना पायाला अलगद स्पर्श करत त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोहम्मदनेही त्यांना प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच एनडीआरएफच्या जवानांनी तो पिलर कटरच्या साह्याने तोडून चिमुकल्या मोहम्मदला या ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढले. तब्बल 18 ते 19 तास अंधारात, उपाशी आणि भीतीच्या छायेत राहिलेल्या मोहम्मदने बाहेर आल्यानंतर एक शब्द उच्चारला तो म्हणजे 'अम्मी आणि अब्बू'.

मोहम्मदला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तब्बल 18 तास मोहम्मदने आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीशी झुंज दिली. शेवटी तो या संकटातून बाहेर पडला. मोहम्मदची आई आणि दोन बहिणींचा शोध सध्या एनडीआरएफचे जवान घेत आहेत. पण मोहम्मद या संकटातून बालंबाल बचावला.

दरम्यान, रायगडमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कालचा एक आणि आज चार मृतदेह दिसत आहेत. ढिगाऱ्याखाली 18 ते 19 लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते. त्यापैकी 75 जण सुरक्षित असून अजूनही काही जण अडकले आहेत. एनडीआरएफची टीम  घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget