Wardha News : तृतीयपंथी शिवानी वर्धा जिल्हा आयकॉन; मतदार नोंदणीसाठी करणार जनजागृती
Wardha News Update : विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली वर्ध्याची ॲड. शिवानी सुरकार ( Shivani Surkar) हिची वर्धा जिल्हा ‘आयकॉन’ (Wardha district icon) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Wardha News Update : मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत जास्तीत जास्त तरुणांनी मतदार नोंदणी करावे यासाठी तरुणांना प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. यासाठी विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली वर्ध्याची ॲड. शिवानी सुरकार ( Shivani Surkar) हिची वर्धा जिल्हा ‘आयकॉन’ (Wardha district icon) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केली आहे. त्यासाठी शिवानीने प्रशासनाचे आभार मानलेत. प्रशासनाने दिलेली ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळणार असल्याचं शिवानीने एबीपी माझासोबत बोलताना सांगितलंय.
आगामी निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत 32 हजार नवीन मतदार नोंदणी करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरपर्यंत 6500 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मतदार नोंदणीत जास्तीत जास्त तरुणांनी नोंदणी करण्यासाठी तरुणांना प्रेरीत करणाऱ्या व्यक्तीमत्वाची आवश्यकता होती. त्यानुसार "विदर्भाची पहिली तृतीयपंथी वकील" म्हणून नावलौकिक मिळविलेल्या अॅड. शिवानी सुरकार हिची ‘आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोण आहे अॅड. शिवानी?
शिवानी यांनी वर्धा येथून बी. कॉमचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सेवाग्राम इथून एमबीए पूर्ण केलं. दिल्ली विद्यापीठाचा एनडीडी हा नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रमही शिवानीने पूर्ण केला आहे. त्यानंतर तिने वर्ध्यातील यशवंत महाविद्यालयातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं केलं. शिवानी देशात तिसरी, राज्यात दुसरी तर विदर्भात पहिली तृतीयपंथी वकील ठरलीय. चार पदव्या असलेली शिवानी आता तरुणांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करणार आहे.
तृतीयपंथीमध्ये जनजागृती करण्याचं काम
शिवानीने महिंद्रा आणि श्रीराम फायनान्स या कंपन्यांमध्ये काही दिवस नोकरी केली. परंतु एका मुलाच्या वेशात जाणे पसंद न पडल्याने आणि तिला काही अपमानजनक गोष्टीचा सामना करावा लागल्याने तिने नोकरी सोडली. नोकरीन सोडल्यानंतर ती मुंबईला आली. काही दिवस मुंबईत राहिल्या नंतर पुन्हा ती वर्ध्यात परत आली आहे. आता वर्धेतच तृतीयपंथीमध्ये जनजागृती करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय तिने घेतला. या कामासोबतच ती आता वर्धा येथे मतदार नोंदणीसाठी नव्या मतदारांना जागृत करणार आहे.
महत्वाच्या बातम्या