एक्स्प्लोर
वादळी वाऱ्याचा फटका, वर्ध्यात 30 हजार कुटुंब अंधारात
युद्धपातळीवर प्रयत्न करत महावितरणने 25 ते 30 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला, मात्र अजूनही एवढेच ग्राहक अंधारात आहेत.
वर्धा : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. युद्धपातळीवर प्रयत्न करत महावितरणने 25 ते 30 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला, मात्र अजूनही एवढेच ग्राहक अंधारात आहेत.
भूगाव देवळी ही वाहिनी बंद पडल्याने हा अडथळा झाला. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. परिणामी वर्धा शहर आणि परिसरास वीज पुरवठा करणारी महापारेषणची भूगाव- देवळी 131 के व्ही. वाहिनी बंद पडली.
त्यामुळे महावितरणच्या देवळी, भिडा, अडेगाव, सावंगी, मदनी, खरंगणा गोडे, म्हाडा कॉलनी, विदुयत भवन, वायफळ, वायगाव येथील वीज उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद झाला.
सुमारे 50 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला होता. बॅक फीडच्या पर्यायी व्यवस्थेतून वर्धा शहराचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला. उर्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
विदर्भासह राज्यभरात मान्सून पूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र यापूर्वीच मान्सून पूर्व पावसाने मोठं नुकसान केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement