एक्स्प्लोर

बंद मंदिरांना वीज बिलाचा शॉक! विठ्ठल मंदिरात लॉकडाऊनमध्ये एक कोटीचं दान अन् वीजबिल 84 लाख

विठ्ठल मंदिर गेल्या 15 महिन्यापासून बंद असल्याने मंदिराला जवळपास 60 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे जवळपास 15 महिने बंद आहेत. त्यामुळे भाविकांचं नसल्याने तिजोरीचाही  खडखडाट झाला आहे. मात्र मंदिरे बंद असली तरी देवाचे नित्योपचार नियमानुसार सुरु असून मंदिराची भक्त निवास,दर्शन मंडप आणि इतर उपक्रमाचा खर्चही सुरूच आहे . यामुळे आता मिळणारे तोकडे उत्पन्न देखील सगळे वीज बिल भरण्यात जाऊ लागल्याने कर्मचारी पगार आणि इतर खर्चाचा प्रश्न देखील आ वासून समोर उभा राहिला आहे. वास्तविक राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे संकट संपले नसल्याने मंदिर न उघडण्याची राज्य शासनाची भूमिका रास्त आहे पण आता मंदिरांच्या खर्चाचा बाबतीत देखील मदतीच्या दृष्टीने विचार करणेचे गरजेचे बनले आहे . 

विठ्ठल मंदिर गेल्या 15 महिन्यापासून बंद असल्याने मंदिराला जवळपास 60 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरवर्षी विठ्ठल मंदिराला विविध माध्यमातून जवळपास 32 ते 35 कोटीचे उत्पन्न मिळत असते. सध्या मात्र मंदिर बंद असल्याने केवळ मंदिराबाहेर नामदेव पायरी येथे असलेल्या पेटीत  भाविकांकडून टाकलेल्या पैशातून मंदिराचा खर्च सुरु आहे. या पेटीत महिन्याला साधारण आठ ते साडे आठ लाख रुपये जमा होतात. मात्र याचवेळी विठ्ठल मंदिर, 272 खोल्यांचे भक्त निवास, तुकाराम भवन, दर्शन मंडप, गोशाळा अशा मंदिराच्या उपक्रमांसह येणारे वीज बिल महिन्याला जवळपास ७ लाख रुपये येते. म्हणजे पेटीत येणाऱ्या उत्पन्नातील 84 टक्के रक्कम ही फक्त वीज बिल भरण्यासाठी जाते. 

वास्तविक जेव्हा मंदिर सुरु असते तेव्हा मंदिराचे वीज बिल महिन्याला 12 ते 13 लाखापर्यंत येत असते. पण अशावेळी मंदिराचे उत्पन्नही महिना सरासरी अडीच ते तीन कोटी पर्यंत असल्याने या बिलाची अडचण भासत नाही. मंदिरे उघडी असताना विठ्ठल मंदिराचा वर्षभराचा वीज बिलाचा खर्च जवळपास 1 कोटी 44 लाखापर्यंत असतो. तर मंदिर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वर्षाला 4 कोटी 20 लाख रुपये असतात. देवाच्या नित्योपचाराला सरासरी वर्षाला 21 लाखांचा खर्च येतो. पण सध्या लॉक डाऊनमुळे  भाविकांकडून येणारे उत्पन्न थांबले असताना वीज बिलापोटी वर्षाला जवळपास 84 लाखाचे बिल भरणे विठ्ठल मंदिरासारख्या मोठ्या संस्थेलाही अडचणीचे बनत आहे. अशाच पद्धतीने इतर लहान मोठ्या मंदिरातही वीज बिलापोटी लाखो रुपये भरावे लागत आहेत.

 मंदिरात भाविक नसल्याने उत्पन्न बंद असताना ही भल्या मोठ्या रकमेची बिले द्यायची कशी हाच प्रश्न आता देवस्थानांना सतावू लागला आहे. शिखर शिंगणापूर मंदिराचीही अशीच अवस्था असून सध्या मंदिर बंद आणि लाखोंची वीज बिले पेंडिंग अशी स्थिती झाली आहे . आता कोरोनामुळे अजून काही दिवस मंदिरे बंद ठेवायची असली तरी किमान या मंदिराच्या वीजबिलांना किमान सवलत देण्याची भूमिका शासनाने घेण्याची मागणी होऊ लागली आहे . 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
Embed widget