Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ ज्या अधिकाऱ्यांची सेवा झाली त्यांना तात्काळ बदला असे आदेश निवडणूक आयोगानं (Election Commission) दिले आहेत.
Election Commission News : 3 वर्षांपेक्षा जास्त ज्या अधिकाऱ्यांची सेवा झाली त्यांना तात्काळ बदला असे आदेश निवडणूक आयोगानं (Election Commission) दिले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसांत बदल्या करा, असे आदेश दिले असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Rajeev Kumar) यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आज पार पडली. यामध्ये निवडणुकीच्या संदर्भातील महत्वाची माहिती त्यांनी दिली.
राज्यात पुरुष आणि महिला मतदार किती?
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरुष मतदार हे 4. 95 कोटी आहेत. तर स्त्री मतदार हे 4.64 कोटी आहेत. तसेच दिव्यांग 6.32 लाख आहेत. तर थर्ड जेंडर मतदार हे 5997 आहे. याचबरोबर पहिल्यांदा मतदान करणारे मतदार हे 19.48 लाख आहेत. जो सभेसाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज करेल त्याला मैदान देण्याची संधी दिली जाईल. अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.
कधी होणार विधानसभेची निवडणूक?
दिवाळी आणि छट पूजा हे सण लक्षात घेऊन तारखा जाहीर कराव्यात अशी या पक्षांनी विनंती केल्याची माहिती निवडणूक आयोगानं केली आहे. पक्षांनी अशी देखील विनंती केली की मोबाईल सोबत असल्यामुळं अनेकांना मतदान करता आलं नव्हतं ,त्यामुळे विधानसभेला याचा विचार व्हावा. मतदानासाठी जाताना मोबाईल परवानगी नाही. मात्र सोबत जर मतदार मोबाईल घेऊन गेला असेल तर तो ठेवण्याची व्यवस्था करावी अशी देखील विनंती पक्षांनी केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. फेक न्युज वाढत आहे त्याचा बंदोबस्त करण्या बाबत देखील सांगण्यात आलं आहे.
मतदारांना करता येणार तक्रार
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा (Election 2024) आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी (ATM) पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे.
महत्वाच्या बातम्या: