एक्स्प्लोर

अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा, सर्व मंत्रिपदं सोडली

जळगाव/मुंबई : अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची अखेर उचलबांगडी झाली आहे. खडसेंनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिला आहे.   खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. देवगिरी या निवासस्थानावरुन खडसे एकटेच वर्षाकडे निघाले, तेव्हा त्यांच्या गाडीवरील लाल दिवा झाकलेला होता. त्यामुळे खडसे राजीनामा देेणार हे निश्चित होतं.   यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा 'वर्षा' बंगल्यावर उपस्थित होते.   खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.

खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला शपथविधी?

एबीपी माझाच्या बातमीवर शिक्का   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच एकनाथ खडसेंचा राजीनामा घेणार याबाबतची बातमी एबीपी माझाने सकाळीच दिली होती.  फक्त महसूलमंत्रिपदच नाही, तर खडसेंची सर्व मंत्रिपदं काढून घेणार अशीही बातमी माझ्याच्या सूत्रांनी दिली होती.  त्यावर शिक्कामोर्तब झालं.   दरम्यान  खडसेंचा राजीनामा घेण्याचे आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. कथित पीएची लाचखोरी, दाऊदच्या कॉललिस्टमधील खडसेंचा कथित नंबर, तसंच भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण या आरोपांमुळे खडसेंना विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनेने घेरलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून पक्षनेतृत्वाने अखेर खडसेंचा राजीनामा घेतला आहे.     दिल्ली दरबारी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद मोदींमध्ये जवळपास अर्धा तास गुप्त बैठक झाली होती. या बैठकीपूर्वी फडणवीस यांनी खडसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसदर्भातला अहवाल अमित शाहांकडे सोपवला होता.     यानंतर खडसेंचा निर्णय विधानपरिषद निवडणुकीनंतर होईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने पक्षावर दबाव वाढत होता.  त्यामुळे भाजपाध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांना खडसेंचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले.  

खडसेंचं ट्विट

अज्ञातवासात असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसेंचं प्रसारमाध्यमांना शुक्रवारी दर्शन  झालं. मोबाईल क्लिप आणि ट्विटरच्या माध्यमातून खडसेंनी मला शेतकऱ्यांसाठी काम करु द्या असं आवाहन केलं.   माझ्याविरोधातील सगळे आरोप हा नियोजित कटाचा भाग आहे, असं म्हणत एकनाथ खडसेंनी स्वकीयांवरच निशाणा साधला होता. खडसे अज्ञातवासात असल्याचं म्हटलं जात असलं, तरी ते मुंबईतील निवासस्थानीच असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. खडसेंनी ट्विटरवर म्हटलं आहे की, “मी मीडियाला विनंती करतो की, एक जबाबदार कृषीमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देत आहे. तथ्यहीन आणि नियोजित आरोपांना मला उत्तरं देण्याऐवजी मला माझी कामं करु द्या.”

एकनाथ खडसेंनी सोडलेली मंत्रिपदं :

*महसूल

*कृषी

*पशूसंवर्धन

*राज्य उत्पादन शुल्क

*दुग्धविकास आणि मत्स्यपालन

*अल्पसंख्याक विकास  आणि वक्फ मंत्री

 

भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण भोवलं?

  भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी खडसे सध्या रडारवर होते.  भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन गेल्या महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. परंतु ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं आहे.

 लाल दिवा सोडून खडसे जळगावात

  एकनाथ खडसेंनी चार दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही हजेरी लावली नाही. शिवाय जळगावमध्ये खडसेंनी लालदिव्याची गाडीही वापरली नाही. मुक्ताईदेवीच्या यात्रेसाठी आपण जळगावात आलं असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं होतं. नाराजीमुळे कॅबिनेट बैठकीला दांडी मारुन जळगाव दौऱ्याला गेल्याच्या चर्चेनंतर खडसेंनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मंत्रिपदापेक्षा मुक्ताईदेवीचा सोहळा महत्त्वाचा असून यात्रेची तारीख आधीच निश्चित झाल्याची सारवासारवही त्यांनी केली होती.    

खडसेंवरील आरोप

  * कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक * जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप * दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा * भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद    

एकनाथ खडसे यांची कारकीर्द

 

*2 सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाळी गावात जन्म झाला. *खडसेंचे वडील शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण कोठाळी गावातील शाळेतच झालं. *खडसेंना सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुणपणीच राजकारणात सक्रीय होते. *एकनाथ खडसे 1987 मध्ये खडसे कोठाळी गावचे सरपंच म्हणून निवडून आले. तिथूनच्या त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला *1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. *खडसेची सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी निवड झाली. *1995 मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं. *2010 साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ खडसेंची निवड झाली. *तर 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. *ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने खडसे नाराज होते, मात्र त्यांची महसूलमंत्रीपदी वर्णी लागली. *एकनाथ खडसे यांची सून रक्षा या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत. *खडसे महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी या महानंद डेअरीच्या संचालक झाल्या. *तसंच मुलगी रोहिणी खडसे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या

 तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे

खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन

‘तो’ अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे

खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील

सबळ पुराव्यांशिवाय खडसेंवर बोलणार नाही, अण्णांची भूमिका

खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण

विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?

खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला

मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता

ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण

..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे

खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget