एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील कार्यक्रमाला खडसेंची दांडी
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यामधील दुरावा अजूनही कमी झाला नसल्याचं चित्र आज जळगावच्या जामनेरमध्ये पहायला मिळालं.
महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला मुंबईहून मुख्यमंत्री दाखल झाले. पण त्यांच्याच जिल्ह्यात होत असलेल्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांनी दांडी मारली.
कालच या कार्यक्रमाच्या रुपरेषेसाठी आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी गोंधळ घातला होता. एकनाथ खडसे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेच्या तळाला असल्यानं खडसे समर्थकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आज अपेक्षेप्रमाणेच खडसे यांनी अनुपस्थिती लावून विस्तव कायम असल्याचेच संकेत दिले.
दरम्यान, या कार्यक्रमाला पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, सहकार मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement