एक्स्प्लोर

वायरल सत्य | 'ती' अंडी प्लास्टिकची नव्हे, उष्णतेचा परिणाम

उष्णतेमुळे अंड्याच्या आतील आर्द्रतेचं प्रमाण कमी होऊन ती वजनाने हलकी होतात. परिणामी, अंडी उकडली जातात, तेव्हा पिवळा भाग काहीसा कडक आणि रबरासारखा होतो.

सांगली : अंड्यातून प्लास्टिकसारखे द्रव्य निघतानाचा व्हिडीओ वायरल झाला आणि देशात प्लास्टिकची बनावट अंडी तयार होत असल्याचे मेसेज वायरल होऊ लागले. त्यात सांगलीतील एका कुटुंबाने अंडी खरेदी केली असता त्यांनाही असाच अनुभव आला. मात्र ही अंडी प्लास्टिकची नसून उष्णतेमुळे अशी झाल्याचं आता समोर आलं आहे. महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असल्याचा फटका आता अंड्यांनाही बसला आहे. उष्णतेमुळे अंड्याच्या आतील आर्द्रतेचं प्रमाण कमी होऊन ती वजनाने हलकी होतात. परिणामी, अंडी उकडली जातात, तेव्हा पिवळा भाग काहीसा कडक आणि रबरासारखा होतो. मात्र, तापमान सामान्य असते तेव्हा असे प्रकार घडत नाहीत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तपासणीनंतर ही माहिती दिली आहे. या प्रक्रियेत अंड्यांच्या पोषणमूल्यात काहीही बदल होत नाही. पूर्वीसारखीच त्यातील पोषकता सुरक्षित राहते. साधारपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात कमी मागणीमुळे अंडी शीतगृहात साठवली जातात. पुढे थंडी वाढल्यानंतर ती बाजारात येतात. काय झालं होतं? सांगलीच्या बुधगावमधील ज्ञानेश्वरनगर परिसरातील दुकानातून युवराज साठे यांनी अंडी खरेदी केली होती. ती शिजवत असताना फुटू लागली आणि भांड्यात साबणासारखा फेस तयार होऊन प्लॅस्टिक जळाल्यासारखा वास येऊ लागला. पुन्हा खात्री करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दुकानातून अंडी आणून शिजवली असता ती चांगली निघाली.
सांगलीत आढळली प्लास्टिकची अंडी?
यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उच्चांकी तापमान होतं. आपल्याकडे रोजच्या गरजेसाठी लागणारी अंडी शीतगृहात न ठेवता थेट बाजारात आणली जातात. वाहतूक प्रक्रियेत रेफ्रिजरेटेड कंटेनर्स वापरली जात नाहीत. वाढत्या उष्म्यामुळे माणसाच्या ऊर्जेची पातळी खालावते. अशावेळी शरीराची झीज टाळण्यासाठी अंड्यांची गरज असते. त्यामुळे नियमितपणे अंडी खाल्ली पाहिजेत. अंडी उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असतात, त्यात चुकीच्या माहितीचा फटका त्यांना बसू शकतो. त्यामुळे वायरल होत असलेला हा व्हिडीओ आणि प्लास्टिकची अंडी असलेला दावा 'माझा'च्या वायरल चेकमध्ये खोटा ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget