एक्स्प्लोर
Advertisement
जेजुरीच्या खंडोबालाही दुष्काळाच्या झळा, अभिषेकासाठी टँकर मागवला
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे.
पुणे : महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे.
आज सकाळी देवाच्या पालखीचे कऱ्हा नदीकडे स्नानासाठी प्रस्थान झालं आहे. देवाच्या पालखीचं कऱ्हा नदीत स्नान होईल. परंतू यंदा खुद्द देवालाच दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. कारण यंदा कऱ्हा नदीत पाणी नसल्याने टँकरच्या पाण्याने देवाला स्नान घातलं जाणार आहे.
VIDEO | कांचन कुल यांना उचलून घेत आमदार राहुल कुल यांनी जेजुरी गडाच्या पायऱ्या चढल्या | एबीपी माझा
सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय. खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळीधमक झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली.
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे.
VIDEO | सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा | पुणे | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भविष्य
राजकारण
Advertisement