एक्स्प्लोर
टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांवर एक मोठं संकट पाकिस्तानातून आलं आहे. टोळधाडीच्या संकटामुळे राज्यातील विविध भागातील हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
![टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री Drone spraying to control locusts crisis, Agriculture Minister Dada Bhuse says टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/29125254/bhuse.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात 50 टक्के यश आले आहे. ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमन बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्याचा केले जाईल, असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. ते काल पुण्यात बोलत होते.
यावेळी दादा भुसे म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील बाजार पेठ ठप्प झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान कृषी विभागाचे झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आणखी आवश्यकता भासल्यास त्यातून कृषी क्षेत्र वगळले जाईल. तसेच कृषी विभागाने यापूर्वीच शेतकऱ्यांना सूट दिलेली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आणखी सहकार्य करणार. एखादा शेतकरी शहरातून ग्रामीण भागात पेरण्यासाठी जाणार असेल तर त्यांना क्वारंटाईन भाग वगळून सवलत द्यावी, असं भुसे यांनी म्हटलं.
पाकिस्तानातील टोळधाडीची महाराष्ट्रात एन्ट्री, मध्यप्रदेशमार्गे नागपुरात पोहोचलं संकट, शेतकऱ्यांना धास्ती
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या शिरपूरला टोळ धाडीची भीती
संपूर्ण राज्यात, देशात कोरोनाची धास्ती आहे. या कोरोनाचा शेती व्यवसायाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसलेला असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तवण्यात आलीय. शेतकऱ्यांवर टोळ धाडीच हे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सुरक्षेचे उपाय राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशकडून महाराष्ट्र - मध्यप्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांना टोळ धाडीची भीती वर्तवण्यात आलीय.
शेतकऱ्यांनी काय करावं?
यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सतत जागता पहारा देण्याची गरज असल्याची माहिती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलीय. त्याचबरोबर टोळ धाडीचा संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या शेतामध्ये डबे, पत्रे , त्याचबरोबर ट्रॅक्टरचा तसेच हॉर्नचा मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश्य आवाज करून या कीटकांना पळवून लावता येऊ शकतं असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय. त्याचबरोबर आपल्या शेतात लॅमरो सायक्रो मेट्रिन या औषधाची फवारणी करणे आवश्यक असल्याचं देखील कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय.
पाकिस्तानातून टोळधाड; भारतातल्या 5 लाख एकरवरच्या उभ्या पिकांसाठी धोका!
बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई
बोगस बियाणे प्रकरणी काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र कुणी बोगस बियाणे विक्री करत असेल, वाढीव दराने बियाणे आणि खताची विक्री करत असेल. तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलाय.
राज्यात बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणे दिले जात आहे. त्यामुळे एका गोणी मागे 10 ते 30 रुपये शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. राज्यात मुबलक बियाण आणि खात उपलब्ध आहे. युरिया 50 हजार मेट्रिक टन बफार स्टॉक केला जाणार आहे. त्यामुळे बियाणे आणि खतासाठी शेतकऱ्यांना अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन, तूर, कांदा, मका, ज्वारी खरेदीचा आढावा घेतला. 15 जून पर्यंत खरेदी पूर्ण करायची सूचना केली असून उद्दिष्ट सफल होईल, असंही त्यांनी म्हटलं.
टोळधाडीचा मुंबईला धोका नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार : महापालिका
महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत काही शेतकऱ्यांना अडचणींमुळे लाभ झाला नाही अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार आहे. काही ठिकाणी 50 टक्के पर्यंत तर काही ठिकाणी 10- 15 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 30 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात पात्र झालेल्या दोन लाखांच्या आतील हे शेतकरी आहेत. 19 लाख शेतकऱ्यांचे 12 हजार कोटी रुपये खात्यावर वर्ग झालेले आहेत. 11 लाख शेतकऱ्यांचे साडेनऊ हजार कोटी रुपये लॉक डाऊन मुळे थांबलेल्या होते. मात्र लॉक डाऊन थांबल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. या शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे सरकार भरणार आहे. त्यांना पिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)