एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रावते, देसाई मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे दिवाकर रावते आणि सुभाष देसई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या विभागप्रमुखांची मातोश्रीवर चर्चा झाली. त्यानंतर रावते आणि देसाई मुख्यमंत्र्याच्या भेटीला पोहोचले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार उद्याच, सकाळी 9 वा. शपथविधी!
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानंतर आता उद्या 8 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षीत विस्तारामध्ये कुणाला संधी मिळते आणि कुणाची जबाबदारी कमी होते, हे पाहणं महत्वाचं आहे. नव्या विस्तारात एकूण 9 मंत्री शपथ घेतील, असं सांगण्यात येत आहे. यामध्ये 4 जण भाजपचे, 3 जण मित्रपक्षांचे तर शिवसेनेच्या दोन जणांचा समावेश आहे. उद्या सकाळी 9 वाजता हा शपथविधी होणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement