एक्स्प्लोर
चहा पिताना वाद, 17 वर्षीय तरुणाची मित्रांकडून हत्या

परभणी : चहा पिताना झालेल्या किरकोळ बाचाबाचीतून मित्रांनीच एका तरुणाची हत्या केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला. 17 वर्षीय गंगाधर म्हस्केचा घटनेत मृत्यू झाला आहे. गंगाधर सकाळी फारुख शेख, अक्षय थिटे, शाहरेख शेख, आगा शेख आणि शोएब शेख या पाच मित्रांसह दूरभाष केंद्रासमोरच्या टपरीवर चहा पित होता. याचवेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची होऊन हाणामारी झाली. यात एकानं गंगाधरच्या पोटात चाकू भोसकला. गंगाधरला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता, मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
आणखी वाचा























