एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांनी खडसे समर्थकांचं तिकीट कापलं
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना धक्का दिला आहे. कारण, जळगाव विधानपरिषदेत खडसे समर्थक आणि विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांचा पत्ता कापला आहे. त्यांच्याजागी गिरीश महाजन समर्थक चंदू पटेल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
विधानपरिषदेच्या अर्जासाठी शेवटची फक्त 15 मिनिटं शिल्लक असताना भाजपने चंदू पटेल यांना उमेदवारी जाहीर करुन खडसेंना मोठा दणकाच दिला. चंदू पटेल हे जळगावमधील बडे प्रस्थ समजले जाते.
जळगाव हा खडसेंचा बालेकिल्ला. तसंच जळगाव म्हणजे खडसे हे भाजपमध्ये वर्षांनुवर्षे समीकरण होतं. पण भाजपने याला छेद देत खडसेंचे जळगावमधील विरोधक आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कलाने घेत, त्यांच्या समर्थकाला उमेदवारी दिली.
एकनाथ खडसेंची नाराजी
मात्र एकनाथ खडसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'भाजपचा सक्रिय सदस्य नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन पक्षाने साधनशुचिता जपली असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. चंदू पटेल हे व्यवसायाने बिल्डर असून, ते पक्षाचे सक्रिय सदस्य नव्हते. पक्षाने नवा पायंडा पाडला असावा. सिंधी समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जगवानी यांनाच फेरउमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, मला पक्षाचा निर्णय मान्य आहे, असंही खडसेंनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement