Chhagan Bhujbal on Maratha Reservation : शिंदे समिती बरखास्त करा, सुप्रीम कोर्टाने सांगतिलंय मराठा समाज ओबीसीमध्ये बसत नाही; छगन भुजबळांची मागणी
Chhagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्याला आपोआप ओबीसी आरक्षण मिळते. कुणबी नोंद असल्यास प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, पण सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचे भुजबळ म्हणाले.
पुणे : सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) आम्ही मान्य करणार नाही. राज्यभर नोंदणी तपासण्याची संमती नव्हती. शिंदे समिती बरखास्त करा, सुप्रीम कोर्टाने सांगतिलंय मराठा समाज (<Maratha Reservation) ओबीसीमध्ये (OBC Reservation) बसत नाही, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal on Maratha Reservation) यांनी केली आहे. मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभर दौरे सुरु केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना थेट विरोध सुरु केला आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध सुरुच ठेवला असून आजही त्यांनी शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
शिंदे समितीला राज्यभर पुरावे पडताळण्याची संमती नव्हती
कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्याला आपोआप ओबीसी आरक्षण मिळते. कुणबी नोंद असल्यास प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, पण सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचे भुजबळ म्हणाले. भुजबळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली त्याला हरकत नाही. शिंदे समितीला राज्यभर पुरावे पडताळण्याची संमती नव्हती. सर्वच प्रमाणपत्रावर कुणबी लिहिलं जातंय आहे. आपला मराठा आरक्षणाला विरोध नसून झुंडशाहीला विरोध असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भुजबळ यांनी एक दगड मारला का? एक टायर जाळला का? हे म्हणतात आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करू नका, बीड कुणी जाळलं हे बघा ना. मी जबाबदारीनं वक्तव्य केली आहेत. इतरांना समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे तेवढाच भुजबळला सुद्धा बोलण्याचा अधिकार असल्याचे भुजबळ म्हणाले.
सरसकट मराठा आरक्षण मान्य नाही
भुजबळ पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील कुणबी असून प्रमाणपत्र मिळत नाही हा मूळ मुद्दा होता. याचा तपास व्हावा यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन करा असं सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं काम संपल आहे. सरसकट मराठा आरक्षण द्या ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. मराठवाड्यातील वंशावळ चेक करून कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीमध्ये येतात, असेही त्यांनी सांगितले.
मी कुठल्याही समाजाचा प्रचार करत नाही
यावेळी बोलताना भुजबळ कुठल्याही समाजाचा प्रचार करत नसल्याचे म्हणाले. ते म्हणाले की, मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. मी ओबीसी समाजाची बाजू मांडतो. मनोज जरांगे एबीपी माझावर म्हणतात, भुजबळ यांच्या पाहुण्यांनी बीड जाळलं. मराठा समाजाला विरोध नाही, आरक्षण द्यायला विरोध नाही. पोलीस महिला हॉस्पिटलमध्ये आहेत. पोलिसांना पाठिंबा देण्याची गरज आहे. बीडमध्ये नेमकं काय झालं याबाबत होम मिनिस्टर यांनी माहिती द्यावी.
इतर महत्वाच्या बातम्या