Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरण कधीही हाताळले नाही : सीबीआय
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे.
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआय कडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं न्हवत. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे.
दिशा सालियन हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केली. दिशा सालियनचा मृत्यू हा इमारतीवरुन पडून झाला असल्याचा निष्कर्ष सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काढला होता. मात्र, दिशा सालियन प्रकरणाचा वेगळा तपास हा सीबीआयकडे नव्हता. सुशांत मृत्यूप्रकरणातील ‘एयु’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा आरोप खासदार राहुल शेवाळे केला. त्याचे पडसाद गुरुवारी महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात वादंग उठला होता. त्यामुळे आता सीबीआयने याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. गेल्या काही दिवसांसून हे आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल अशी घोषणा केली. त्या पूर्वीच दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने फोन येत होते आणि एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा असल्याचा आरोप केला होता. शेवाळे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
दरम्यान, हे सर्व सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर मौन सोडले आहे. आज नागपूरमध्ये माध्यमांसोबत बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी माझ्या आजोबाचं निधन झालं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या