एक्स्प्लोर

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गडचिरोली दौऱ्यावर, दुर्गम भागातील पोलीस मदत केंद्राला भेट

गडचिरोली : राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला शनिवारी गडचिरोलीच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या.

गडचिरोली : राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला शनिवारी गडचिरोलीच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या. यावेळी त्यांनी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. एक ते दीड महिन्यापूर्वी येथे एका दिवसांमध्ये जिल्हा पोलीस दलाने नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली होती. या पोलीस ठाण्याच्या परिसराची पोलीस महासंचालक शुक्ला यांनी पाहणी करून नक्षल समस्येचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलसेल गडचिरोली परिक्षेत्राचे आयजी संदीप पाटील डीआयजी अंकित गोयल उपस्थित होते. दरम्यान, भविष्यातही नागरिकांचे असेच  सहकार्य राहिले तर नक्षलवाद पूर्णपणे संपवू, असा विश्वास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केला.

पोलीस महासंचालकांच्या हस्ते आदिवासी नागरिकांना साहित्य वाटप

पोलीस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्याला संबोधित करत मेळाव्यात उपस्थित आदिवासी नागरिकांना शेती, घरगुती, शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप केले. मेळाव्याला संबोधित करताना आदिवासी नागरिकांना पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन करिता जिल्हा पोलीस आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. यावेळी त्यांनी मेळाव्याला उपस्थित विद्यार्थिनी आणि नागरिकांशी संवाद साधला.

पोलीस महासंचालकांसमोर जवानांनी वाचला समस्यांचा पाढा

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अतिदुर्गम गर्देवाडा भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी दुर्गम भागात कार्यरत पोलीस जवानांसाठी दरबार भरवून समस्या जाणून घेतले. यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांनी दुर्गम भागात कर्तव्य बजावताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला.  पोलीस महासंचालक शुक्ला यांनी जवानांच्या समस्या जाणून घेत शासन स्तरावरून  समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून वेगवर्धित पदोन्नती, विशेष कामगिरीसाठी रिवार्ड या प्रक्रियेमध्ये काही बदल लवकरच केले जातील असे सांगितले. 


रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.  महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक, आहेत.  सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. 

आणखी वाचा :

पाण्याचा मीटर चोरल्याचा संशय, ठाण्यात जमावाने धू धू धुतले, दोघांचा मृत्यू  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Pune| संतोष अण्णांना टॉर्चर करू-करू मारलं, पुण्यात बजरंग सोनवणेंचं आक्रमक भाषणAnandache Paan : चिंबोऱ्यांच्या रुपकातून माणसांच्या कथा! बाळासाहेब लबडे यांची  'चिंबोरेयुद्ध' कादंबरीNagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजेAnjali Damania PC : SIT, CID चौकशी धूळफेक; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Embed widget