पाण्याचा मीटर चोरल्याचा संशय, ठाण्यात जमावाने धू धू धुतले, दोघांचा मृत्यू
Thane Ambernath Crime News : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पाण्याचा मोटार चोरल्याच्या संशयावरून काही स्थानिकांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
Thane Ambernath Crime News : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पाण्याचा मोटार चोरल्याच्या संशयावरून काही स्थानिकांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. तपासादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.
अशोक भगत यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी दुर्गादेवी पाड्यात सुरज परमार (25) आणि सूरज कोरी (22) यांचे मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही पाण्याची मोटर चोरून पळून जाताना दिसत आहेत आणि कुत्रे त्यांच्यावर भुंकत आहेत. या आवाजामुळे काही लोक जागे झाले. जमावाने दोघांचा पाठलाग केला आणि त्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. दोघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अंतर्गत जखमांमुळे रक्तस्त्राव होऊन दोघांचाही मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात समोर आलेय. जमावाकडून लिंचिंगची ही एक संशयित घटना आहे.
पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात -
अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ह्या तरुणांची मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा निष्पन्न झाले. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. चोरीचा संशयातून या दोघांना मारहाण करून त्याचे त्यांची हत्या केल्याचे समोर आले असून याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी 20 संशयिताना ताब्यात घेतलंय. चौकशीनंतर दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं घडलं काय ?
सूरज परमार आणि सूरज उर्फ भेय्या निर्मल कोरी असं मयत दोघांची नावे नावे आहेत. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे हे दोन्ही मृतदेह नागरिकांना दिसून आले, याची माहिती तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं. चोरीचा संशयातून या दोघांना मारहाण केली, त्या मारहाणीत मृत्यू झाला . मयत दोघेही तरुण प्रकाश नगर आणि शिवमंदिर परिसरातील राहणारे आहेत. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही संशयतांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. नेमकं कुठल्या कारणास्तव दुर्गादेवी पाडा परिसरात आले होते , यांच्यासोबत कोण कोण होतं, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
आणखी वाचा :
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला खिंडार, कमलनाथ 'कमळ' हातात घेण्याची शक्यता