Jayant Patil:'अजितदादांनी बाकी योजना इतरांच्या दबावाखाली मंजूर केल्या गेल्या का?', जयंत पाटलांनी उपस्थित केला सवाल
Jayant Patil on Ajit Pawar: महायुतीतील पक्षात फायलींवरून धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे, यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: महायुतीतील पक्षात फायलींवरून धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. या दोघांनीही घेतलेल्या भूमिकेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मिनिटांसाठी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. मात्र हा विषय संपल्यानंतर मंत्रीमंडळ बैठक पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, या सर्व घडामोडीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"मला वाटतं दादाला जाऊन तिकडे वर्ष दीड वर्ष झालं. अनेक योजना त्यांनी सह्या करून मान्य केल्या. दादांनी अशी भूमिका घेतली म्हणजे यापूर्वीच्या योजना इतरांच्या दबावाखाली मंजूर केल्या गेल्या का? हा प्रश्न तयार होतो. दादांचं मत दादा आता खरं व्यक्त करायला लागलेत ही चांगली गोष्ट आहे, असं जयंत पाटील (Jayant Patil) यावेळी म्हणालेत.
मंत्रिमंडळ बैठकीत अजित 'दादा'- एकनाथ 'भाई' भिडले
राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असताना आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली.
तुमच्या फाईलवर मी सही करणार नाही, एकनाथ शिंदेंची भूमिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये नगरविकास खात्याच्या फाईलवरून ही खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत असलेल्या नगरविकास खात्याची फाईल ही वाचल्याशिवाय त्यावर सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईल वरती मी सही करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
